Headlines

पुणे पोलीस दलात मोठे फेरबदल:संजय दराडे नवे सह पोलिस आयुक्त; तेजस्वी सातपुते गुन्हे शाखेच्या अपर आयुक्त




महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत. यामध्ये पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नत्यांचा समावेश आहे. या फेरबदलांमध्ये संजय दराडे यांची पुणे शहराच्या पोलीस सह आयुक्तपदी, तर तेजस्वी सातपुते यांची पुणे शहर गुन्हे शाखेच्या अपर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहरात नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये संजय दराडे (विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र येथून) आणि तेजस्वी सातपुते (समादेशक, एसआरपीएफ गट १, पुणे येथून पदोन्नतीने) यांचा समावेश आहे. याशिवाय, एस. व्ही. पाठक (अपर पोलीस आयुक्त, ठाणे येथून विशेष पोलीस महानिरीक्षक, आर्थिक गुन्हे, सीआयडी, पुणे), प्रशांत अमृतकर (समादेशक, एसआरपीएफ गट १६, कोल्हापूर येथून पुणे शहर पोलीस उप आयुक्त), गौहर हसन (पोलीस उप आयुक्त, सोलापूर येथून पुणे शहर पोलीस उप आयुक्त), जीवन बेनवाल (सहायक पोलीस अधीक्षक, जितूर, परभणी येथून पुणे शहर पोलीस उप आयुक्त) आणि पी. आर. पाटील (पोलीस अधीक्षक, सीआयडी, पुणे येथून पुणे शहर पोलीस उप आयुक्त) यांचाही समावेश आहे. पुणे ग्रामीणमध्ये शुभम कुमार (सहायक पोलीस अधीक्षक, अचलपूर, अमरावती येथून अपर पोलीस अधीक्षक) यांची नियुक्ती झाली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस दलात संजय पाटील (पोलीस उप आयुक्त, नवी मुंबई येथून) आणि धिरज पाटील (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, सांगली येथून) यांची पोलीस उप आयुक्तपदी बदली झाली आहे. शफकत आमना (अपर पोलीस अधीक्षक, धाराशिव येथून) यांची पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग – सीआयडी, पुणे पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यातून बाहेर बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये रंजन शर्मा (पुणे शहर पोलीस सह आयुक्त पदावरून विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र), लोहित मतानी (पुणे शहर पोलीस उप आयुक्त पदावरून पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा, नागपूर), शिवाजी पवार (पोलीस उप आयुक्त, पिंपरी-चिंचवड येथून पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई), रमेश नागनाथ चोपडे (अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण येथून उप आयुक्त, सागरी सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभाग), विक्रम देशमुख (पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा, पुणे येथून पोलीस उप आयुक्त, मिरा-भाईंदर-वसई-विरार), हिम्मत जाधव (पुणे शहर येथून पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई) आणि जयंत मीना (अधीक्षक एटीएस पुणे येथून बृहन्मुंबई) यांचा समावेश आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *