Headlines

पुण्यात ओबीसी समाजाचे साखळी उपोषण:जातनिहाय जनगणना, बोगस कुणबी दाखल्यांवर कारवाईसह विविध मागण्या




ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ साखळी उपोषणाला सुरुवात झाली. उपोषणात मंगेश ससाणे, मृणाल ढोले, सुनीता भगत, दिपक जगताप, शोभा शेवकरी, नितीन बोराटे, धनंजय झुरंगे, हनुमंत टिळेकर, सतिश गिरमे स्वप्नील वाघमारे यांसह सकल ओबीसी समाज, पुणे सहभागी झाले आहेत. ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्यांमध्ये जातनिहाय जनगणना, बोगस कुणबी दाखल्यांवर कारवाई, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व वसतिगृह सुविधा, शिक्षण व रोजगारातील आरक्षणाचा अनुशेष भरून काढणे, स्वतंत्र व पुरेसा ओबीसी निधी, राजकीय आरक्षणा संदर्भातील प्रश्न तसेच मंडल आयोगाची पूर्ण अंमलबजावणी यांचा समावेश आहे. वेळोवेळी प्रशासनाला व सरकारला सांगूनही देखील दखल घेतली नाही, त्यामुळे ११ सप्टेंबरला धरणे आंदोलन करण्यात आले होते. पण प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे आता साखळी उपोषण सुरु करण्यात आले. या साखळी उपोषणाची सुरुवात रणरागिणी गौरीताई अक्षय पिंगळे, सुरेश सोपानराव कालेकर (शिंपी समाज) आणि बंडू उर्फ दीपक विठ्ठलराव कचरे यांच्या सहभागाने झाली. आंदोलनात विविध ओबीसी संघटना व कार्यकर्ते सहभागी झाल्या असून, शासनाने ओबीसी समाजाच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मुंबा फिल्म फाउंडेशन आयोजित सातवा मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दि. ६ ते १० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पुण्यात आयोजित करण्यात आला असून ४१ देशांमधून आलेल्या ९८७ चित्रपटांमधून १५२ चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. महोत्सवाचा उद्‌घाटन समारंभ दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे आयोजित करण्यात आला असून उद्‌घाटन व्ही. शांताराम फाउंडेशनचे अध्यक्ष किरण व्ही. शांताराम यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना स्व. विक्रम गोखले स्मृती सन्मान प्रदान केला जाणार आहे. या प्रसंगी नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे डायरेक्टर प्रकाश मगदुम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. उद्‌घाटन समारंभापूर्वी सकाळी ९ वाजता व्ही. शांताराम यांना आदरांजली वाहणारा, त्यांच्या चित्रपट सृष्टीतील कारकीर्दीचा आढावा घेणारा लघुपट ‘द पोर्ट्रेट ऑफ अ पायोनियर’ दाखविला जाणार आहे. हेही वाचा.. मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर प्रश्न विचारणाऱ्या महिला ट्रोल: रेखा कोंडे, ललिता तारक यांची कारवाईची मागणी; अंबड पोलिसांत तक्रार मराठा आरक्षण आंदोलनाबाबत प्रश्न विचारणाऱ्या महिलांना समाजमाध्यमांवर ट्रोल करून बदनाम केले जात असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक रेखा कोंडे आणि अंतरवली सराटी येथील ललिता तारक यांनी केला. महिलांना लक्ष्य करणाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी सोमवारी पुण्यातील पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी अश्विनी मल्हारे आणि वेदश्री जोशी उपस्थित होत्या. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *