![]()
आठवड्यातील दोन दिवस (शनिवार आणि रविवार) पुणे शहरात जड वाहनांच्या वाहतुकीसाठी वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्य भागातील छत्रपती शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता परिसरात खरेदीसाठी गर्दी सुरू झाली असून, शनिवार आणि रविवारी देण्यात आलेली जड वाहनांना परवानगी तात्पुरती रद्द करण्यात आली आहे. दिवाळी संपेपर्यंत मध्य भागात जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ‘शहरातील प्रमुख रस्त्यांवर जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. बांधकाम क्षेत्राशी संबंधित वाहने, मालवाहू वाहनांना शनिवारी आणि रविवारी शहरातील प्रमुख रस्त्यांचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त मध्य भागात खरेदीसाठी सुरू झाली आहे. शनिवारी आणि रविवारी मध्य भागात जड वाहनांच्या वाहतुकीस देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे. जड वाहनांना मध्य भागातील प्रमुख रस्त्यांचा वापर करू नये’, असे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी दिले आहेत. ‘ दिवाळीनिमित्त लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, तसेच महात्मा फुले मंडई, तुळशीबाग परिसरात पुणे शहर, उपनगर, तसेच जिल्ह्यातील नागरिक खरेदीसाठी गर्दी करतात. शनिवारी आणि रविवारी मध्य भागात खरेदीसाठी गर्दी होती. पादचाऱ्यांची सुरक्षा, तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मध्य भागात शनिवारी, रविवारी जड वाहनांना देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे. दिवाळी संपेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत’, असे पोलीस उपायुक्त भाजीभाकरे यांनी नमूद केले.
Source link
पुण्यात छत्रपती शिवाजी रस्ता, बाजीराव रस्त्यावर जड वाहनांना बंदी:दिवाळीमुळे मध्य भागातील वाहतुकीत बदल, शनिवार-रविवारची परवानगी रद्द