Headlines

पुण्यात शाळकरी मुलावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला:आंबेगाव बुद्रुकमध्ये दोन अल्पवयीन ताब्यात, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा




शाळकरी मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना आंबेगाव बुद्रुक भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले अल्पवयीन वर्गमित्र आहेत. अल्पवयीनांनी केलेल्या हल्ल्यात १५ वर्षीय शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला आहे. शाळकरी मुलाचा खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोन अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुलाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलगा आणि या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेली मुले हे वर्गमित्र आहेत. त्यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. तक्रारदार मुलगा हा वडगाव बुद्रुकमधील घुलेनगर परिसरात राहायला आहे. मंगळवारी (२९ सप्टेंबर) दुपारी बाराच्या सुमारास तो शाळेत निघाला होता. आंबेगाव बुद्रुक भागातील दभाडी परिसरात शाळकरी मुलाला वर्गमित्रांनी गाठले. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन ते पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पसार झालेल्या दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्यांना येरवड्यातील पं. जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रात दाखल करण्यात आले आहे. भारतीय विद्यापीठ पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत. शाळकरी मुलांमधील वादातून मारामारीच्या घटना यापूर्वी शहरात घडल्या आहेत. भवानी पेठेतील एका शाळेसमोर मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना गेल्या वर्षी घडली होती. हेही वाचा.. ठाण्यात ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या: पूर्णेकर कुटुंबीयांचे माजी महापौरांवर गंभीर आरोप, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मानपाडा परिसरातील क्लस्टर डेव्हलपमेंट आणि राजकीय वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत असून, पूर्णेकर कुटुंबीयांनी ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर या हत्येचे सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *