![]()
पैठण येथील ३१० एकर क्षेत्रातील संत ज्ञानेश्वर उद्यान ‘दिव्य मराठी’च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर पुन्हा सुरू झाले आहे. तरी सध्या उद्यानातील व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दररोज हजारो पर्यटक उद्यानाला भेट देत असताना, मूलभूत सुविधांचा अभाव आणि
.
पाटबंधारे विभागाच्या ताब्यात असलेल्या या उद्यानाकडे संभाजीनगर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप उद्यान विकास समितीने केला आहे. ^ उद्यानातील काही बाबी वरिष्ठांना कळविल्या आहेत. लवकरच इतर कामे सुरू होतील. स्वच्छता, दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य दिले जाईल. – प्रशांत संत, कार्यकारी अभियंता आमदार विलास भुमरे यांनी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. नवीन टेंडर प्रक्रियेनंतर कामे सुरू होतील, असा दावा करण्यात येत आहे. उद्यान विकास समितीचे प्रा. संतोष गव्हाणे, रमेश शेळके, बाळू आहेर, संतोष गोबरे, बजरंग काळे, शिवाजी गाडे, पवन लोहिया, रमेश लिंबोरे आदींनी उद्यानाची पाहणी केली. तातडीने साफसफाई, संगीत कारंजा दुरुस्त करण्याची मागणी केली.