![]()
पैठण शहरात दररोज हजारो भाविक संत एकनाथ महाराज यांची जन्म अन् कर्मभूमी असलेल्या या पवित्र नगरीत भाविक गंगा-गोदावरी स्नान, संत एकनाथ महाराज समाधी दर्शन, नाथ मंदिर, प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर उद्यान आणि पैठणी साडी केंद्रासह ऐतिहासिक नागघाटाला भेट देतात. मात्र, या सर्व निसर्गरम्य व धार्मिक स्थळांची भ्रमंती केल्यानंतर बसस्थानकावर पोहोचणाऱ्या पर्यटकांना मूलभूत सोयी-सुविधांच्या अभावाला सामोरे जावे लागत आहे. प्रवासादरम्यान व बसची वाट पाहताना पर्यटक केळी, भुईमुगाच्या शेंगा, चिप्स, कुरकुरे व बिस्किटे यांसारख्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात. मात्र, खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर कचरा टाकण्यासाठी संपूर्ण बसस्थानक परिसरात कुठेही कचराकुंडी उपलब्ध नाही. त्यामुळे कचरा कुठे टाकावा असा प्रश्न पर्यटकांसमोर निर्माण होतो. डस्टबिन न दिसल्याने पर्यटकांना बसस्थानकातील आडोशाचा आधार घेऊन तिथेच कचरा टाकावा लागत आहे. अशा प्रकारे उघड्यावर टाकलेल्या कचऱ्यामुळे परिसर अस्वच्छ होत असून याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
Source link
पैठण बसस्थानकावर कचराकुंड्यांचा अभाव; प्रवाशांसह पर्यटकांची गैरसोय:लक्ष देण्याची मागणी: आगाराकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष