Headlines

जलसाठ्यातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवणार:फुलंब्री तहसीलदार कार्यालयाकडून आदेश जारी‎




यंदा फुलंब्री तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे संपूर्ण परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या उन्हामुळे आणि पाण्याच्या अपुऱ्या साठ्यामुळे आगामी काळात नागरिक तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा ठाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संभाव्य तीव्र पाणीटंचाईवर मात करण्यासाठी फुलंब्री तहसीलदार कार्यालयाने तातडीने कठोर पावले उचलली असून, ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत उपलब्ध जलसाठ्याचे केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच नियोजन करण्याचे आदेश जारी केले आहेत. तालुक्यातील मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या पाणवठ्यावरून तसेच धरणांच्या बुडीत क्षेत्रातील विहिरींवरून सिंचनासाठी होणारा अनधिकृत पाणी उपसा तात्काळ थांबवण्याचे आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी महसूल विभाग, पाटबंधारे विभाग, महावितरण, पोलीस विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली मंडळनिहाय विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके जलसाठ्यांवर प्रत्यक्ष गस्त घालून विजेच्या तारांवर अनधिकृत आकडे टाकून होणारा पाणी उपसा शोधतील. तसेच अशा अनधिकृत वीज जोडण्या तोडणे आणि अवैध उपसा करणाऱ्यांच्या विजेच्या मोटारी जप्त करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे काम हे पथक करणार आहे. प्रशासनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे पिण्याच्या पाण्याचा साठा सुरक्षित राहण्यास मोठी मदत होणार आहे. या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी महसूल विभाग, पाटबंधारे विभाग, महावितरण, पोलीस विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली मंडळनिहाय विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. विद्युत पुरवठा बंद करण्यास तीव्र विरोध प्रशासनाच्या या भूमिकेमुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात असंतोष पसरला आहे. तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असली तरी मुख्य प्रकल्प व पाझर तलावांमधील विद्युत लाइन कट केल्यास पिकांसोबतच जनावरांना आणि शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळणे मुश्कील होईल, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे मुख्य प्रकल्प व पाझर तलावांतर्गत असणाऱ्या विद्युत लाइन कापण्याची कारवाई करू नये, अशी मागणी शेतकरी प्रशासनाकडे करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *