Headlines

चांदवड‎:दुर्गेश ह्याळीज याने ‘इस्त्रो’मध्ये मिळवला ‘बेस्ट इंटर्न’चा बहुमान




येथील जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी दुर्गेश ह्याळीज याने ‘इस्रो’मधील इंटर्नशिपमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. १७ जून ते १८ ऑगस्टदरम्यान इंटर्नशिप पूर्ण करत त्याने देशभरातील ४० विद्यार्थ्यांमधून ‘बेस्ट इंटर्न’ हा बहुमान पटकावला. सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीत दुर्गेशने इस्रोच्या थेट संशोधन प्रकल्पांवर काम केले. कोडिंगमधील कौशल्य आणि प्रकल्पातील प्रत्यक्ष योगदानाची इस्रोच्या ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी विशेष दखल घेत त्याची सर्वोत्कृष्ट इंटर्न म्हणून निवड केली. दुर्गेशच्या यशाबद्दल संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेशकुमार लोढा, मानद सचिव जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, उपाध्यक्ष अरविंदकुमार भन्साळी आदींनी त्याचे अभिनंदन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *