![]()
शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत करण्यात आलेल्या अतिक्रमणांविरोधात अखेर प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता बीड रोडवरील शासकीय दूध डेअरी परिसरापासून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली. महामार्गाच्या गटारापासून दोन्ही बाजूंना सुमारे तीन मीटर म्हणजेच १० फूट अंतरातील अतिक्रमणे हटविण्यात येत आहेत. शहरातील तात्पुरती तसेच कायमस्वरूपी अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने हटविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महसूल प्रशासन, जामखेड नगरपरिषद, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलीस प्रशासन संयुक्तपणे या मोहिमेत सहभागी झाले आहेत. तहसीलदार शितल सावळे, मुख्याधिकारी अजय साळवे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी तसेच महामार्ग विभागाचे अधिकारी व कर्मचारी कारवाईच्या ठिकाणी उपस्थित होते. जामखेड शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित होता. रस्त्याच्या कडेला उभारलेल्या टपऱ्या, दुकाने आणि इतर अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर वारंवार वाहतूक कोंडी होत होती. महामार्गाच्या कामावरही अतिक्रमणांचा परिणाम झाल्याने काम रखडण्याची स्थिती निर्माण झाली होती. तीन वर्षांपासून रखडलेली मोहीम सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. रस्ते मोकळे होऊन वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे. मात्र, कारवाई करताना सर्व अतिक्रमणांवर समान निकषाने व नियमानुसार कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. पुढील काही दिवसांत संपूर्ण शहरात कारवाई {बीड रोडपासून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात. { महामार्गाच्या गटारापासून दोन्ही बाजूंना १० फुटांतील अतिक्रमणांवर कारवाई. { तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी अतिक्रमणांवर टप्प्याटप्प्याने हातोडा. महसूल, नगरपरिषद, महामार्ग व पोलीस प्रशासनाचा संयुक्त सहभाग. { अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त. { संपूर्ण शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याची प्रशासनाची तयारी.
Source link
कारवाई:वाहतूक कोंडीला कारणीभूत अतिक्रमण हटवली; जामखेडमध्ये धडक मोहीम