![]()
कन्नड तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यातील सर्व सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. तालुक्यातील १६ प्रकल्पांमध्ये केवळ १७.७ टक्केच साठा असल्याने अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी सर्व विद्युत पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले असून यासाठी संयुक्त पथके तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती तहसीलदार सारिका भगत यांनी दिली. तहसीलदारांच्या सूचनेनुसार गटविकास अधिकारी ओमप्रकाश रामावत, विजयकुमार पंडित, पाटबंधारे विभागाच्या उपअभियंता सबा मोहसीन खान, महावितरणचे उपविभागीय अभियंता आर. पी. वाघचौरे, शाखा अभियंता गणेश वाघ, सहायक अभियंता आर. पी. शिंदे, कैलास मोरे आदी बैठकीस उपस्थित होते. अंबाडीत ७ टक्केच साठा उपअभियंता सबा मोहसीन खान यांनी दिलेल्या माहितीनुसार यात अंबाडी मध्यम प्रकल्प ७%, पूर्णा नेवपूर ७९, वाघदरा २३, गणेशपूर ०.३०, कुंजखेडा ५.९, आठेगाव खेडा ०, देवपूडी १, सातकुंड १३, सिरजगाव मृतसाठा, गौताळा तलाव १, निंभोरा ५९, वडोद ७४, डोणगाव ०, माटेगाव ८८, वडनेर ३२ आणि मुंगसापूर प्रकल्पात शून्य टक्के साठा आहे.
Source link
कन्नड तालुक्यामधील प्रकल्पांत 17% साठा:सर्व पाणी आता पिण्यासाठी राखीव, 16 प्रकल्पांवरील वीजपुरवठा बंद