Headlines

संभाजीनगरात 16 ऑक्टोबरपासून 10% पाणी कपात:जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, औद्योगिक घटकांना 30% पुनर्वापर बंधनकारक‎




जिल्ह्यात चालू वर्षात अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत नागरिक व जनावरांना पिण्यासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध राहावा या दृष्टीने धरणे, तलाव व अन्य जलस्रोतांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणी वापरात किमान १० टक्के कपात करावी. गळती थांबवण्यासाठी मोहीम राबवून प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर उद्याने, बांधकाम, रस्ते व औद्योगिक कामांसाठी करावा. औद्योगिक घटकांनी ३० टक्के पाण्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येक प्रमुख जलाशयातील उपलब्ध जिवंत पाणीसाठ्यापैकी किमान १० टक्के साठा अतिरिक्त आपत्कालीन साठा म्हणून राखीव ठेवण्यात येणार आहे. जिवंत साठा अपुरा पडल्यास मृत साठ्यातील पाणी वापरण्याचे नियोजन आगाऊ तयार ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच धरणांमधून सिंचनासाठी प्रस्तावित किंवा सुरू असलेली पाणी आवर्तने तात्काळ बंद करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. या बैठकीस अधिकारी उपस्थित होते. सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी दर १५ दिवसांनी समितीची बैठक घेऊन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल, जलसंपदा, पाणीपुरवठा, महावितरण, पोलीस व कृषी विभागांनी समन्वयाने निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना आल्या आहेत. प्रशासनाकडून पाण्याचे नियोजन केले जात आहे. प्रकल्पस्तरावर फिरती पथके स्थापन होणार : यासाठी प्रत्येक तालुक्यात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त पथक आणि प्रकल्प स्तरावर फिरती पथके स्थापन करण्यात येणार आहेत. यामध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस व महावितरणच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल. या पथकाकडून अनधिकृत वीज जोडण्या खंडित करून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *