Headlines

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांचे आदेश:पुणे पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या




पुणे पोलिस दलातील १८ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील विविध पोलिस ठाण्यांमधील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या बदल्यांमध्ये कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने यांची फरासखाना पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. तर, फरासखाना पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण घोडके यांची कोथरूड पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांची काळेपडळ पोलिस ठाण्यात नेमणूक झाली आहे. वाहतूक शाखेतील पोलिस निरीक्षक रुणाल मुल्ला यांना डेक्कन पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकपदी नियुक्त करण्यात आले आहे. काळेपडळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांची भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांची विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात, तर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांची लष्कर पोलिस ठाण्यात नेमणूक करण्यात आली आहे. खडक पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय करनूर यांची नऱ्हे पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. लष्कर पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखेतील निरीक्षक प्रदीप पवार यांना लोणी काळभोर पोलिस ठाण्यात नियुक्त करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे, राहुलकुमार खिलारे, भाऊसाहेब पाटील आणि आसाराम शेटे यांची पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांची वानवडी पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक उत्तम नामवाडे यांची विशेष शाखेत, नवनाथ जगताप यांची विश्रामबाग पोलिस ठाण्यात, तर वाहतूक शाखेतील पोलिस निरीक्षक संगीता जाधव यांची वानवडी पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. पुणे पोलिस दलात नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक संतोष कोळी यांना गुन्हे शाखेत पाठवण्यात आले आहे. कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) बदली करण्यात आली आहे. याशिवाय, विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगेश हांडे यांची मुंबई पोलिस दलात बदली झाल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *