Headlines

प्रफुल्ल पटेलांनी 'मर्जर' नावाची संघटना काढावी:विलीनीकरणाचा खेळ गल्लीतून दिल्लीत जाईल, पण मध्येच पाऊस पडेल- संजय राऊत




महाराष्ट्रात आणि राष्ट्रीय स्तरावर विलीनीकरणाचा एक उत्तम खेळ सुरू आहे. या खेळातून लोकांचे मनोरंजन होत असून, लोकांना आपणही या खेळात सहभाग घेतल्यासारखे वाटत आहे, ज्यामध्ये मोठे-मोठे खेळाडू सामील होतात. प्रफुल्ल पटेल यांनी ‘मर्जर’ नावाची संघटना काढावी असा खोचक टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच, राष्ट्रीय स्तरावर विलीनीकरणाचा एक नवा खेळ आणला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. संजय राऊत पुढे म्हणाले की, विलीनीकरणाचा हा खेळ सध्या गल्लीबोळात सुरू आहे आणि याचा चांगला सराव होत असल्याने ते हळूहळू दिल्लीत जातील. या सामन्याचा निकाल लागणारच नाही, कारण मध्येच पाऊस पडेल. शरद पवार या नव्या खेळाचे मार्गदर्शक होणार नाहीत, ते लोकांना खेळायला भाग पाडतील; पण ते स्वतः क्रिकेटच्या मैदानावर असतील. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या विलीनीकरणाच्या खेळात पंच म्हणून सहभागी होऊ शकतात. मला विचारा आणि निर्णय घ्या, म्हणजे निकाल आधीच फिक्स करा आणि मग खेळायला जा, असेच ते म्हणतील. नवी मुंबई विमानतळावरून राऊतांचा सवाल संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकेकाळी नवी मुंबई विमानतळाचे कौतुक केले होते; पण आता त्यांना कळाले आहे की, आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी नवी मुंबई विमानतळावर लॅडिंग करण्यास नकार दिला असून हे विमानतळ सुरक्षित नाही. अशा विमानतळाच्या उभारणीमध्ये मोठी गुंतवणूक झाली, लोकांची घरं गेली, जमिनी गेल्या आणि पर्यावरणाचा र्हास झाला. हा सर्व खटाटोप कोणाच्या इशाऱ्यावर झाला, हे सत्य बाहेर आले पाहिजे. मुंबईचे विमानतळच आंतरराष्ट्रीय विमानतळ असावे संजय राऊत म्हणाले की, मुंबईतील विमानतळ मुंबईतच राहायला हवे, त्यात तुम्ही सुधारणा करू शकता; पण ते बाहेर हलवणे योग्य नाही. मी नवी मुंबई विमानतळावरून प्रवास करण्याचा दोन वेळा प्रयत्न केला, पण मला ते चांगले वाटले नाही. तिथे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभारणे शक्य नाही. तिथली एकमेव धावपट्टीही भयान आहे. तिथे आंतरराष्ट्रीय सोडाच, पण कोणतेही विमान उतरवू नये. मुंबईतून तिथे जाताना प्रवाशांची दमछाक होते. आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बाहेर आल्यावर प्रवाशांना कसे चित्र दिसायला हवे अन् प्रत्यक्षात काय दिसते? तिथे बस, टॅक्सी मिळत नाही आणि धूळ-मातीमधून रस्ता काढत जावे लागते. मुख्यमंत्र्यांना जी सुबुद्धी सुचली आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. गौतम अदानी यांच्या प्रस्तावाला विरोध संजय राऊत म्हणाले की, अदानी हे काही राज्याचे किंवा देशाचे प्रमुख नाहीत आणि ते कोणते मंत्रीही नाहीत. महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांचा रस आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्या रूट बदलण्यास तयार नाहीत. तिकडे विमानतळ असणे महाराष्ट्रासाठी अडचणीचे आहे, कारण महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे राज्य असून येथे मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक येत असते. परदेशी पाहुणे, उद्योजक व पर्यटक यांना नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ सोयीचे नाही. मुंबईचे विमानतळ हेच खरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून, त्याला दुसरा कोणताही पर्याय नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *