![]()
राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार आणि अजित पवार गट) संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेने जोर धरला आहे. या राजकीय घडामोडींवरून आता महायुतीतही शिंदे गट आणि अजित पवार गटाचे नेते एकमेकांशी भिडल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या टिकेला, शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी अत्यंत आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. “मला बोलायला भाग पाडलं, तर मी कोणाचीही गय करणार नाही,” असा थेट इशाराच शिरसाट यांनी मुश्रीफांना दिला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. मुश्रीफांची टीका आणि शिरसाटांचा संताप राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडींवर शिरसाट यांनी नुकतेच एक विधान केले होते. त्यावर हसन मुश्रीफ यांनी, “संजय शिरसाट यांनी आमच्या पक्षाबद्दल बोलू नये, महायुतीत मिठाचा खडा टाकू नये. एकनाथ शिंदेंनी शिरसाटांना समज द्यावी,” अशी टीका केली होती. या टीकेवर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “हसन मुश्रीफांनी माझे स्टेटमेंट ऐकलेले दिसत नाहीये. पहिले स्टेटमेंट ऐकून घेत जा. दरवेळेला काही जरी आरोप केले तर मी ते सहन करणार नाही, हे मी खात्रीने सांगतो. मी हे सांगितले होते की, आपापसामध्ये जी काही कपडे फाडाफाड चालू आहे, त्याच्यामुळे एखाद्या वेळेला तिसराच पक्ष उदयास येईल. मी कोणती राष्ट्रवादीवर टीका केली? काय चाललंय ना, हे संजय शिरसाट चांगल्या प्रकारे जाणतो.” ‘असे स्टेटमेंट करून मला बोलायला लावू नका’: मुश्रीफांना थेट इशारा देताना शिरसाट पुढे म्हणाले, “कृपया करून, माझी तुम्हाला विनंती आहे की, अशा प्रकारचे स्टेटमेंट तुम्हीही करू नका आणि मला बोलायला लावू नका. मला बोलायला भाग पाडले, तर मग मी कोणतीही गय-माया करणार नाही.” मुख्यमंत्र्यांच्या विधानाचे समर्थन ‘आमच्याशिवाय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत,’ या मुख्यमंत्र्यांच्या अनौपचारिक गप्पांतील विधानावर रोहित पवार यांनी ‘हा सत्तेचा अहंकार आहे’ अशी टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देताना शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलेले आहे, ते अत्यंत विचारपूर्वक केलेले आहे.”
————- हेही वाचा.. संजय शिरसाट अन् रायगडचे नेते महायुतीत मीठाचा खडा टाकत आहेत: एकनाथ शिंदेंनी त्यांना समज द्यावी, राष्ट्रवादीचा तिसरा गट होण्याचा संबंधच नाही- हसन मुश्रीफ
शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट आणि रायगडमधील काही नेते महायुतीमध्ये मीठाचा खडा टाकण्याचे काम करत आहेत. त्यांनी अशा प्रकारच्या कृत्यांपासून दूर राहिले पाहिजे आणि महायुतीमधील तिन्ही पक्षांनी याची दक्षता घेण्याची गरज आहे, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. तसेच, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे सर्व आमदार एकसंघ असून, तिसरा गट स्थापन होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सविस्तर वाचा
Source link