![]()
हिंगोली गेट परिसरातील खालसा फायनान्स कंपनीच्या कार्यालयात माळकौठा येथील शेतकरी चंद्रकांत दगडूजी शिंदे यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. कर्जवसुलीसाठी त्यांचे अपहरण करून दोन दिवस डांबून बेदम मारहाण केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून वजिराबाद पो
.
२२ ऑक्टोबर रोजी चंद्रकांत शिंदे यांना गावातून दुचाकीवर डांबून आणण्यात आले होते. कार्यालयात त्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पत्नी ज्योती शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे शाखा व पोलिसांच्या पथकाने जयकुमार ऊर्फ शेरा गायकवाड (२२), शेख मलंग खान (२५) आणि इम्रान गोवर्धन (४०) यांना उर्वरित अटक केली. चंद्रकांत यांच्यावर रविवारी मूळ गावी अंत्यसंस्कार झाले.
कर्जवसुलीसाठी धमकावल्यास फौजदारी कारवाई- जिल्हाधिकारी
कर्जवसुली करताना सक्ती, धमकी किंवा बेकायदेशीर मार्गांचा अवलंब केल्यास संबंधितांवर थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला. रविवारी मायक्रो फायनान्स संचालकांच्या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले.
आणखी एका तरुणाचे अपहरण, गुन्हा दाखल
आईच्या उपचारासाठी घेतलेल्या ८ हजारांच्या कर्जाचे हप्ते थकल्याने मजुरी करणाऱ्या दत्ता गायकवाड (रा. माळकौठा) याचे अपहरण करून ४० हजारांच्या मागणीसाठी बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी खालसा फायनान्सच्या मालकासह चौघांवर मुदखेड ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मारहाण होत असल्याचे शेतकऱ्याने सांगितले होते
२२ ऑक्टोबरच्या रात्री आठ वाजता आरोपींनी शिंदे यांच्या घरी फोन लावला. चंद्रकांत यांच्या आईकडे ७५ हजारांच्या कर्जाची तातडीने मागणी करत धमकी दिली. त्यानंतर चंद्रकांत यांच्याकडे फोन दिला असता, ‘हे लोक मला खूप मारहाण करत आहेत,’ असे त्यांनी घाबरलेल्या अवस्थेत सांगितल्याचे पत्नीने नमूद केले.