![]()
ग्राहकांना एकाच छताखाली विविध बाजारांमध्ये गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बजाज ब्रोकिंगने आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर कमोडिटी ट्रेडिंग सेवेचा प्रारंभ केला आहे. या नव्या सुविधेमुळे आता युझर्सना मौल्यवान धातू, ऊर्जा, बेस मेटल्स आणि काही विशिष्ट कृषी उत्पादनांमध्ये ट्रेड करता येणार आहे. यात ग्राहकांच्या सोईनुसार स्टँडर्ड आणि मिनी अशा दोन्ही प्रकारच्या कॉन्ट्रॅक्ट्सचा समावेश करण्यात आला आहे. या उत्पादनांचा समाविष्ट या सेगमेंट अंतर्गत ग्राहकांना सोने, चांदी, कच्चे तेल (क्रूड ऑइल), नॅचरल गॅस, तांबे, अॅल्युमिनियम, लेड आणि झिंक यांचे कॉन्ट्रॅक्ट्स मिळतील. यासोबतच कापूस, वेलची आणि मेंथा ऑइल यांसारख्या कृषी कमोडिटीजमध्येही व्यवहार करता येतील. विविध कॉन्ट्रॅक्ट साइज उपलब्ध असल्याने ट्रेडर्स आपल्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडू शकतात. प्रगत अॅनालिसिस आणि ट्रेडिंग टूल्स अॅनालिसिस अधिक सोपे व्हावे यासाठी प्लॅटफॉर्मवर ‘ग्रीक्स’ सह कमोडिटी ऑप्शन्स चेन देण्यात आली आहे. याच्या साहाय्याने मूळ कमोडिटीच्या किमतीतील चढ-उतार, बाजारातील अस्थिरता आणि एक्स्पायरीचा कालावधी यांचा ऑप्शनच्या किमतींवर होणारा परिणाम ट्रेडर्सना स्पष्टपणे समजून घेता येईल. तसेच एकाच वेळी अनेक ऑर्डर्स सबमिट करण्यासाठी ‘बास्केट ऑर्डर्स’चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. ऑर्डर आणि प्राइस अलर्टच्या सोयी ट्रेडर्स आवश्यक मार्जिन आणि अटींनुसार ‘इंट्राडे’ किंवा ‘नॉर्मल’ हे प्रॉडक्ट टाइप निवडू शकतात. याशिवाय, ‘गुड टिल ट्रिगर्ड’ (GTT) ऑर्डर्सची सोय देण्यात आली असून, निश्चित केलेल्या ट्रिगर अटी पूर्ण होताच ऑर्डरची प्रक्रिया आपोआप सुरू होईल (मात्र, याचे अंतिम एक्झिक्युशन बाजारातील उपलब्धतेवर अवलंबून असेल). अपेक्षित किमतीचा टप्पा गाठल्यास युझर्सना तात्काळ कळावे यासाठी प्राइस अलर्ट्सची रचना करण्यात आली आहे. पारदर्शकता आणि रिअल-टाइम डेटा एकाच स्क्रीनवर किमतींचे लाइव्ह ट्रॅकिंग आणि ऑर्डर एक्झिक्युशन शक्य व्हावे यासाठी रिअल-टाइम मार्केट डेटा व अद्ययावत चार्ट्स जोडण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, ऑर्डर देण्यापूर्वीच लागू असणारे ब्रोकरेज व इतर वैधानिक शुल्क स्पष्टपणे दिसत असल्याने ट्रेडिंग खर्चात पूर्ण पारदर्शकता राहते. कंपनीची भूमिका या नव्या सुविधेविषयी माहिती देताना बजाज ब्रोकिंगच्या प्रवक्त्याने सांगितले की, कमोडिटी सेवेच्या माध्यमातून ग्राहकांसाठी गुंतवणुकीचे नवे पर्याय खुले केले जात आहेत. ऑप्शन्स अॅनालिसिस, सुलभ ऑर्डर एक्झिक्युशन आणि ट्रॅकिंग या सर्वांची सांगड एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर घालून तंत्रज्ञानावर आधारित उत्तम अनुभव देणे हे कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे. या नव्या उपक्रमामुळे बजाज ब्रोकिंगच्या डिजिटल पोर्टफोलिओचा अधिक विस्तार झाला असून कमोडिटी बाजारात उतरणाऱ्या गुंतवणूकदारांना एकात्मिक साधनांचा मोठा फायदा होणार आहे.
Source link
बजाज ब्रोकिंगचा नवा पुढाकार:डिजिटल प्लॅटफॉर्मवर कमोडिटी ट्रेडिंग सुरू; सोने, चांदी अन् क्रूड ऑइलमध्ये व्यापाराची संधी