Headlines

बागेश्वरबाबाच्या प्रतिमेला मारल्या चपला:शिवरायांच्या अवमानप्रकरणी उद्धवसेनेची पोलिसांत तक्रार; प्रतिमा पायदळी तुडवली‎




हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला. बेताल वक्तव्य करणाऱ्या, बागेश्वर बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धीरेंद्र कृष्ण शास्त्रीच्या प्रतिमेला चपला मारत प्रतिमा पायदळी तुडवण्यात आली. तसेच याप्रकरणी तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी आक्रमक मागणी उद्धवसेनेच्या वतीने करण्यात आली. शहरप्रमुख आशिष गावंडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात धडक देत निवेदन सादर केले. उर्वरित पान ४ महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल जातीय वाचक, विखारी वक्तव्य करून समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भोंदू धीरेंद्र शास्त्री याच्यावर महाराष्ट्रबंदी घालण्याची मागणी शिवसैनिकांनी केली. त्यानंतर शिवसैनिकांनी आपल्या पायातील चप्पला काढून बाबाच्या प्रतिमेला मारल्या. त्याच्या वक्तव्याचा निषेधही नोंदवला. भोंदू बाबाला महाराष्ट्रबंदी करण्याचीही केली मागणी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *