Headlines

बारामतीत गरोदर महिलेवर अत्याचार करून हत्या:हातोड्याने हल्ला, गळा आवळून संपवलं




बारामती तालुक्यात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पणदरे एमआयडीसी परिसरात एका गरोदर महिलेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने आधी महिलेच्या डोक्यात हातोड्याने वार केले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून गळा आवळून तिचा जीव घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील आरोपीला माळेगाव पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या दोन तासांत ताब्यात घेतले. गणेश रामचंद्र माने (वय 26) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नेमकं प्रकरण काय आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पणदरे एमआयडीसी परिसरात संबंधित महिलेवर आरोपीने हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. त्यानंतर आरोपीने तिच्यावर अत्याचार केला आणि गळा आवळून तिची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. परिसरातील माहिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयित गणेश माने याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे मृत महिलेच्या वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे समोर आले. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे. महिलेवर नेमका कोणत्या कारणातून हल्ला करण्यात आला, यासह या गुन्ह्यामागील इतर बाबींचा पोलिस तपास करत आहेत. महिलेचे दागिने आणि हातोडा जप्त पोलिसांनी आरोपीकडून महिलेच्या अंगावरील सोन्याचे डोरले आणि पैजण जप्त केले आहेत. तसेच हत्येसाठी वापरलेला हातोडा आणि आरोपीचे रक्ताने माखलेले कपडेही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे या वस्तू या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे मानले जात आहेत. आरोपीला पोलीस कोठडी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी गणेश माने याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ करत आहेत. दरम्यान, बारामती तालुक्यात अलीकडेच एका 19 वर्षीय तरुणाने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच गरोदर महिलेच्या हत्येची घटना समोर आल्याने परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील सर्व बाजूंचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. हेही वाचा.. 19 वर्षीय तरुणाने गोळी झाडून घेत केली आत्महत्या:महिलेसोबतचे प्रेमप्रकरण भोवले, पतीला समजताच उचलले टोकाचे पाऊल सूर्यनगरी परिसरातील जयश्री अपार्टमेंटमध्ये 19 वर्षीय तरुणाने स्वतःच्या डोक्यात पिस्तुलातून गोळी झाडून घेतल्याची धक्कादायक घटना घडली. गंभीर जखमी अवस्थेत त्याच्यावर बारामती आणि त्यानंतर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. अविष्कार अमोल ढोले असे मृत तरुणाचे नाव आहे. सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *