![]()
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी झालेल्या संगमनेर येथील पहिल्या बैठकीवेळी दूर राहिलेले सभापती राम शिंदे तसेच राष्ट्रवादीचे खा. निलेश लंके मंगळवारी अहिल्यानगर शहरातील बैठकीत एकत्र आले. खा. लंके यांनीही बिनविरोधला सहमती दिली अ
.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय जोडे बाहेर काढून, संगमनेरात दोन आठवड्यापूर्वी बैठक झाली होती. त्यावेळी सभापती शिंदे व खा. लंके उपस्थित नव्हते. निवडणुकीच्या आडून अजेंडा चालवणे गैर असल्याचा स्पष्ट संदेश त्यावेळी शिंदे यांनी दिल्यामुळे विखे व शिंदे यांच्यातील दुरावा स्पष्ट झाला होता. आता बुधवारी (२१ ऑक्टोबर) अर्ज माघारीची अंतिम मुदत आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा अहिल्यानगर येथील सर्किट हाऊसवर मंगळवारी पुन्हा सर्वपक्षीय (२० ऑक्टोबर) बैठक बोलावली होती. या बैठकीला सभापती शिंदे, खा. लंके, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी खा. सुजय विखे, तसेच सर्वपक्षीय आमदार उपस्थित राहिले.
बैठकीनंतर सभापती शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी जिल्ह्याच्या राजकारणातील टोकाचे विरोधक असलेले थोरात व विखे उपस्थित होते.
सभापती शिंदे म्हणाले, बैठकीसाठी सर्व आजी-माजी आमदार लोकप्रतिनिधींना बैठकीला निमंत्रण दिले होते. तालुकानिहाय चर्चा झाली. त्यात निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरले. यापूर्वी काही मतभेद असल्यामुळे अधिकचे अर्ज दाखल झाले होते. परंतू, उद्या ११ ते १२ वाजता बिनविरोधबाबत अधिकृत घोषणा पालकमंत्री राधाकृष्ण विखे करतील. पण बिनविरोधचा आकडा सांगणे कठीण असल्याचे स्पष्ट केले. बैठकीला उपस्थित सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खा. निलेश लंके, माजी खा. सुजय विखे आदी.
आम्ही नसलो बँकेत, तरी बिनविरोध करा : लंके २१ ऑक्टोबरला चित्र स्पष्ट होईल. बिनविरोधसाठी आशावादी राहिले पाहिजे. बैठक सुरू असली, तरी मी उपवास सोडला नाही म्हणून निघून आलो. बिनविरोध होत असेल तर आमचे फॉर्म काढून घेऊ. अर्जदारांशी चर्चा केली पाहिजे. आमची व क र्जतवाल्यांची भूमिका एकच आहे, ती म्हणजे कामधेनू टिकली पाहिजे.
…तर आमच्याकडे ६२ ठराव : आ. दाते पारनेर तालुक्यात खा. निलेश लंके यांच्यासह आमदार काशिनाथ दाते, राहूल शिंदे, गितांजली शेळके रिंगणात आहेत. लंके समर्थकांकडून ६८ ठराव आपल्या बाजुने असल्याचा दावा होत आहे. याबाबत आ. दाते यांना विचारले असता त्यांनी, तसे असेल तर आम्ही म्हणतो आमच्याडे ६२ ठराव आहेत. गुंता सोडवायचा असेल तर सुटेल.
जिल्ह्यात आतापर्यंत बिनविरोध कोण कोण ? संगमनेर येथून रणजित सिंह देशमुख व नेवासेत शंकरराव गडाख यांचा एकमेव अर्ज असल्याने या दोन जागा बिनविरोध झाल्यात जमा आहेत. याव्यतिरिक्त शेवगाव येथे राजश्री घुले व चंद्रशेखर घुले दोनच अर्ज असल्याने, त्यापैकी एक माघार होऊन बिनविरोध शक्य आहे.कोपरगावर कोल्हे पिता पुत्रांचे अर्ज असल्याने ती जागा बिनविरोध मानली जात आहे. दुसरीकडे राहुरीत सत्यजित कदम व आ. प्राजक्त तनपुरे आहेत. कोण थांबणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे. त्यामुळे सद्यस्थिती पाहता, सहा जागा बिनविरोध होतील, पण अंतिम चित्र माघारीनंतरच स्पष्ट होईल.