![]()
आर्थिक विवंचनेतून उपाशीपोटी झोपी जाणाऱ्या किंवा शारीरिक हतबल असलेल्या किंवा निराधार वंचितांना दोन वेळचा जेवणाचा डब्बा घरपोहोच दिला जाणार आहे. निराधारांची भूक भागवण्याच्या हेतूने मंगळवेढ्यात अंबिका अन्नपूर्णा योजनेचा शनिवारी (दि. ७) प्रारंभ झाला. या योजनेच्या माध्यमातून मंगळवेढा शहरातील जे निराधार व्यक्ती आहेत, ज्यांना कोणतेही पाल्य सांभाळणारे नाही किंवा कोणतेही नातेवाईक सांभाळत नाहीत, अशा निराधार व्यक्तींना घरपोहोच डबे पोहोच केले जाणार आहेत. निराधार वंचितांना दोन वेळचा पोटभर जेवणाचा डब्बा देण्यात पोहोच करण्यात येणार आहे. शहरात कान्होपात्रा बहुउद्देशीय प्रसारक मंडळ मंगळवेढा संस्थेच्यावतीने अंबिका अन्नपूर्णा योजनेचा प्रारंभ करण्यात आला. भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या संकल्पनेतून ही योजना सुरू करण्यात आली आहे. या वेळी चव्हाण म्हणाले, एक आपुलकीचा घास भरून सामाजिक भान या माध्यमातून जपले जाणार आहे. या योजनेकरिता आमची सर्व टीम काम करत आहे. ज्यांना या योजनेमध्ये स्वतःचे योगदान द्यायचे आहे अशा व्यक्तीने देखील यामध्ये हातभार लावावा. या वेळी भाजप राज्य परिषद सदस्य राजेंद्र सुरवसे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुदर्शन यादव, तालुकाध्यक्ष नागेश डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य सचिन जाधव, माजी जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर, ज्येष्ठ नेते अशोक माळी, सुशांत हजारे, अभिजित लोखंडे, अजित लेंडवे, माजी सैनिक स्वामी आदी उपस्थित होते. भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम सुरू करण्यात आला. पहिल्याच दिवशी जवळपास ७५ लोकांना घरपोहोच डबा देण्यात आला आहे. शहरात हा पहिलाच उपक्रम आहे. यामध्ये शहरातील एकही निराधार वंचित राहणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. सदरील योजनेचा प्रारंभ हा सामाजिक भान जपत, सामाजिक आपुलकी वाढावी याकरता करण्यात आलेला आहे. ही योजना कायमस्वरूपी आम्ही चालवणार आहे. या माध्यमातून मंगळवेढा शहरातील कोणताही निराधार अन्नापासून वंचित राहणार नाही. त्याला पोटभर जेवणदेणार आहोत. शशिकांत चव्हाण, जिल्हाध्यक्ष, भाजप
Source link
मंगळवेढ्यात निराधारांना रोज 2 वेळचा डब्बा:अंबिका अन्नपूर्णा योजनेचा प्रारंभ, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्यातर्फे योजना