![]()
मराठवाड्यात मागील वर्षी अतिवृष्टी, तरया वर्षी दुष्काळी परिस्थिती. या दुष्टचक्रातसापडलेले शेतकरी आर्थिक अडचणीतसापडले आहेत. मागील जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत ६५३शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. म्हणजेच सर्वसाधारण दररोज ३शेतकऱ्यांची आत्महत्या केल्या. यामध्येकोणी गळफास घेतला, तर कोणी विषप्राशन करून टोकाचे पाऊल उचलले. मराठवाड्यात मागील वर्षी ४९ लाखहेक्टरवर पेरणी झाली होती. यामध्येजालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातमका, कापूस या पिकांचे क्षेत्र अधिकआहे. लातूर, बीड, धाराशिव, हिंगोली,परभणी, नांदेड या भागात सोयाबीन,कापूस, तूर, उडीद, मूग, ज्वारी या पिकांचेक्षेत्र आहे. खरीप हंगामातील पिकांच्याउत्पादनावरच शेतकऱ्यांकडून आर्थिकगणित मांडले जाते. त्यामुळे खरीपहंगामच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मानलाजातो.मराठवाड्यात जानेवारी २६ तेऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत६५३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलेआहे. यामध्ये सर्वात जास्त १४९ शेतकरीआत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत.त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगरजिल्ह्यात आत्महत्यांची नोंद झाली आहे. जिल्हानिहाय आत्महत्या,कंसात मदतीची संख्या जिल्हानिहाय आत्महत्या, कंसात मदतमिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या अशी : बीडजिल्ह्यात १४९ पैकी ७९ शेतकऱ्यांची कुटुंबेमदतीसाठी पात्र ठरली. छत्रपती संभाजीनगर१३८ (७५), जालना ६१ (३०), परभणी ४५(१५), हिंगोली ४४ (२४), नांदेड ८२ (५२),धाराशिव ८८ (६०), लातूर ४६ (२८). ६५३ शेतकऱ्यांनी टोकाचेपाऊल नापिकीमुळे उचलले मागील वर्षीची अतिवृष्टी व यंदाचा दुष्काळयामुळे खरीप पिके उद्ध्वस्त झाली. पिकांचेनुकसान, डोक्यावर असलेले कर्ज, मुलांचेशिक्षण, मुलींचे लग्न व कुटुंबाचा उदरनिर्वाहकसा चालवायचा या आर्थिक चिंतेतूननैराश्यात येऊन मराठवाड्यात आठ महिन्यांत६५३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मदतीसाठी २२६ प्रकरणेअद्यापही प्रलंबित मदतीसाठी मराठवाड्यात शेतकरीआत्महत्येची २२६ प्रकरणे अद्यापहीनिर्णयासाठी प्रलंबित आहेत. यामध्ये छत्रपतीसंभाजीनगर जिल्ह्यात ५६, जालना २४, बीड५४, परभणी २५, हिंगोली ६, नांदेड २८,धाराशिव २७, तर लातूर जिल्ह्यातील ६प्रकरणांचा समावेश आहे. आरोग्य विभागाने गावपातळीवर शिबिरे घेऊन शेतकऱ्यांचे समुपदेशन करावे ^मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांचे समुपदेशन करणे आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने गावपातळीवरशिबिरे घ्यावीत. याशिवाय अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ताणतणाव व्यवस्थापनासाठी आवश्यक कार्यवाही करावी. यामुळे मराठवाड्यातीलशेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होर्हल. – डॉ. दीपक डोणेकर, मनसोपचारतज्ज्ञ
Source link
मराठवाड्यात रोज सरासरी 3 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले:जानेवारी ते ऑगस्टदरम्यान बीडमध्ये सर्वाधिक बळी; संभाजीनगर दुसऱ्या क्रमांकावर