![]()
मतदार यादी शुद्धीकरण आणि विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत मराठवाड्यातील तब्बल २१ लाख ४६ हजार, तर राज्यातील २ कोटी ०७ लाख ९३ हजार ९१६ मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांमध्ये एकूण १ कोटी ५७ लाख ९८ हजार ४९६ मतदारांपैकी १ कोटी ३६ लाख ४५ हजार ५६७ मतदारांचे अर्ज डिजिटाइज्ड झाले आहेत. मात्र, उर्वरित २१ लाख ४६ हजार ४३३ (१३.६३%) अर्ज अजून गोळा होऊ शकले नाहीत. आयोगाच्या निकषांनुसार प्रत्यक्ष पडताळणी न झालेले हे अर्ज वगळले गेल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांमधील राजकीय समीकरणांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक ६ लाख १२ हजार ७०१ (१९.०५%) मतदार वगळले जाऊ शकतात. अनेक विधानसभा मतदारसंघांत समीकरणे बदलू शकतात २८८ पैकी अनेक विधानसभा मतदारसंघांत विजय १,००० ते ५,००० मतांच्या फरकाचा मिळत असतो. तेथील १० ते १५ हजार नावे वगळली गेल्याने समीकरणे बदलू शकतात. दावे, हरकतींवर सुनावणीनंतर २७ ऑक्टोबरला अंतिम यादी येणार
जिल्हा एकूण मतदार डिजिटाइज्ड अर्ज (%) वगळणी पात्र अर्ज (%)
संभाजीनगर ३२,१६,१६७ २६,०२,५८९ (८०.९२%) ६,१२,७०१ (१९.०५%)
नांदेड २७,७७,०७३ २३,८७,६३५ (८५.९८%) ३,८७,७६५ (१३.९६%)
जालना १६,८२,७२३ १४,३८,५५२ (८५.४९%) २,४३,८९५ (१४.४९%)
बीड २१,९३,८२७ १९,५२,२०३ (८८.९९%) २,४१,५८० (११.०१%)
लातूर २०,०४,४५० १७,८८,१०८ (८९.२१%) २,१२,८४५ (१०.६२%)
धाराशिव १४,१३,८६४ १२,३१,८६७ (८७.१३%) १,८१,८७३ (१२.८६%)
परभणी १५,४१,००७ १३,६०,७१० (८८.३०%) १,८०,२९७ (११.७०%)
हिंगोली ९,६९,३८५ ८,८३,९०३ (९१.१८%) ८५,४७७ (८.८२%)
मराठवाडा १,५७,९८,४९६ १,३६,४५,५६७ (८६.३७%) २१,४६,४३३ (१३.६३%) मराठवाड्यात २१.४६ लाख, नांदेडमध्ये ३.८७ लाख मतदारांची नावे यादीतून कट होऊ शकतात
बीड, जालना, नांदेड अशा काही लोकसभा मतदारसंघात काट्याची लढाई झाली होती. तेथे मोठ्या प्रमाणात नावे वगळली गेल्याने नेत्यांना नव्याने आखणी करावी लागेल.
मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम देशात आतापर्यंत सुमारे ७.४ कोटी नावे वगळली देशात एसआयआरमध्ये सुमारे ७ कोटी ३८ लाख मतदार वगळले गेले. त्यापैकी काही राज्यांचा तपशील असा. बिहार : ७.८९ कोटींपैकी ४७ लाख (५.९५%) नावे वगळली. उत्तर प्रदेश : १५.४४ कोटींपैकी २.०५ कोटी (१३.२१%) नावे वगळली. गुजरात : ५.०८ कोटींपैकी ६८ लाख (१४.५%) नावे वगळली. तामिळनाडू : ६.४१ कोटींपैकी ७४ लाख (११.५%) नावे कमी झाली. मध्य प्रदेश : ५.७४ कोटींपैकी ३४.२५ लाख (५.९६%) वगळले. राजस्थान: ५.४६ कोटींपैकी ३१ लाख (५.७%) नावे वगळली. छत्तीसगड : २.१२ कोटींपैकी २५ लाख (११.८%) नावे हटवली. पश्चिम बंगालमध्ये वगळलेल्या ५८.२० लाख नावांत २४.१७ लाख मृत, १.३८ लाख दुबार, तर ३२.६५ लाख स्थलांतरित होते.
Source link
महाराष्ट्राची एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात:संभाजीनगरात 6.12 लाख, राज्यात 2.8 कोटी मतदार वगळले जाण्याची शक्यता