Headlines

मुंबईतील पोलिसही मनोहरमामाचे भक्त; भोंदूगिरीचा बाजार लाखोंपर्यंत:पुण्यात फ्लॅट्स तर गाणगापुरात मठ, पोलिस कोठडीचा आज शेवटचा दिवस



करमाळ्याचा भोंदूबाबा मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे यांच्या पोलिस कोठडीचा आज (मंगळवारी) शेवटचा दिवस आहे. तपासादरम्यान काही धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. भोंदूबाबाच्या मायाजालात मुंबईतील काही वरिष्ठ पोलिस अधिकारीही ‘भक्त’ म्हणून

.

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सोलापूरचे गुन्हे अन्वेषण शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, कुर्डूवाडी व करमाळा पोलिस स्टेशनचे पथक, सायबर पथक आणि डीवायएसपींचे विशेष तांत्रिक पथक अशा विविध यंत्रणांनी तपासाचा फास आवळला आहे.

संपत्ती व मालमत्तेचे जाळे​

भोसले आपल्या आई-वडिलांपासून वेगळा राहून पुण्यात पत्नी व तीन मुलांसह वास्तव्यास होता. तिथे भक्तांनी त्याला दिलेले अनेक फ्लॅट्स असल्याचे उघड झाले आहे. ​गाणगापूर येथे एका नवीन भव्य मठाची उभारणी सुरू आहे.

साथीदार रडारवर

दुसरा आरोपी विशाल वाघमारे हा भोसलेचा नातेवाईक आहे. पोलिसांनी मठातील काही सेवेकऱ्यांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली आहे. या रॅकेटमध्ये आणखी किती लोकांचा सहभाग आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत.

आर्थिक व्यवहारांची चौकशी​

भक्तांकडून ११ हजारांपासून ते लाखो रुपयांपर्यंतच्या देणग्या घेतल्या गेल्या आहेत. मात्र, हा ट्रस्ट धर्मादाय आयुक्तांकडे अधिकृतपणे नोंदणीकृत आहे का? या पैशांचे ऑडिट झाले आहे का? आणि हा पैसा नेमका कुठे गुंतवण्यात आला? या तांत्रिक बाबींचा तपास करण्यासाठी पोलिसांनी धर्मादाय आयुक्तांशी पत्रव्यवहार केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *