![]()
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर गुरुवारी सकाळी ‘बर्निंग बस’चा थरार पाहायला मिळाला. पनवेलजवळ किलोमीटर १६ च्या आसपास पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव प्रवासी बसला अचानक भीषण आग लागली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने एक्स्प्रेसवेवर काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सुदैवाने सर्व प्रवाशांना वेळेतच बसमधून सुखरूप बाहेर काढण्यात आल्याने एक मोठा अनर्थ टळला आहे. अग्निशमन दल आणि ‘देवदूत’ टीमची तत्परता मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ७:५५ च्या सुमारास ही घटना घडली. चालत्या बसमधून अचानक धूर आणि आगीचे लोळ येऊ लागल्याने गाडी थांबवण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पनवेल आणि खोपोली नगर परिषदेचे अग्निशमन दल तसेच आयआरबीची (IRB) ‘देवदूत’ रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. आगीची भीषणता पाहता अतिरिक्त गाड्याही मागवण्यात आल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत काही वेळातच या भीषण आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. प्रवासी सुरक्षित, कारण अद्याप अस्पष्ट या दुर्घटनेत बस जळून खाक झाली असली तरी, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही सर्वात मोठी दिलासादायक बाब आहे. बसमधील सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत. ही घटना रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. चालत्या बसला अचानक एवढी भीषण आग लागण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या पोलिसांकडून आगीच्या खऱ्या कारणांचा सविस्तर तपास केला जात आहे. या घटनेमुळे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक काही काळासाठी संथगतीने सुरू होती, मात्र आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर ती पूर्ववत करण्यात आली. घटनेचे तीन व्हिडिओ.. नोएडामध्ये एसी बसला आग लागली, 9 जण जिवंत जळाले: यमुना एक्सप्रेसवेवर अपघात, 35 प्रवाशांना घेऊन महोबाला जात होती बस उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये यमुना एक्सप्रेस-वेवर खासगी स्लीपर एसी बसला आग लागली. या दुर्घटनेत 9 प्रवासी जिवंत जळाले. बसमध्ये 35 प्रवासी होते. अनेक प्रवाशांनी खिडक्या तोडून उड्या मारत आपला जीव वाचवला. ही दुर्घटना बुधवारी रात्री 12 वाजता घडली. बस नोएडाहून महोबाला जात होती. ही बस राज कल्पना ट्रॅव्हल्सची आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. 45 मिनिटांत आग आटोक्यात आणण्यात आली; मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. सविस्तर वाचा
Source link
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर 'बर्निंग बस'चा थरार:पनवेलजवळ चालत्या ट्रॅव्हल्सला भीषण आग, सर्व प्रवासी सुरक्षित