Headlines

Rohit Pawar Attacks MPSC Over Exam Controversy; Demands Chairman Resignation


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील पेपरफुटी आणि भोंगळ कारभारावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी करत, 27 सप्टेंबर रोजी

.

‘अध्यक्षांच्या राजीनाम्याशिवाय क्लीनअप शक्य नाही’

रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आयोगाच्या कारभारावर टीका केली. “आजच्या घडीला राज्यसेवा आयोगाला पेपरफुटीचं ग्रहण लागलं असून आयोगाच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे. आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याशिवाय आयोगातील भ्रष्टाचाराचे क्लीनअप शक्यच नाही,” असे ते म्हणाले. सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचा असेल तर अधिकारी आणि त्यांची निवड करणारी यंत्रणा पारदर्शक असावी लागते, असे सांगत त्यांनी या पदावर स्वच्छ प्रतिमेची व्यक्ती बसवण्याची मागणी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या

सरकारने पूर्वी केलेल्या घोषणेप्रमाणे ७० हजार पदांची पदभरती तत्काळ सुरू करावी आणि १०० रुपयांत वर्षभर परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, या विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांसाठी येत्या २७ सप्टेंबरपासून पुण्यात आंदोलन पुकारण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या या मागण्या अतिशय रास्त असून, या अभूतपूर्व आंदोलनाला आणि युवाशक्तीला ताकद देण्यासाठी सर्वांनीच पाठिंबा द्यावा, असे आवाहन पवार यांनी केले आहे.

मविआचे दिग्गज नेते देणार साथ

या लढ्यात राज्यातील आणि देशातील दिग्गज नेतेही विद्यार्थ्यांसोबत असतील, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. “लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब, आणि उद्धव ठाकरे साहेब हे देखील विद्यार्थ्यांच्या लढ्याच्या पाठीशी उभे राहून त्यांना नक्कीच ताकद देतील,” असे पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पोलिसांना आणि सरकारला इशारा

आंदोलन चिरडण्याच्या प्रयत्नांवरून त्यांनी पुणे पोलिसांनाही खडेबोल सुनावले आहेत. “विद्यार्थी, क्लासचालक आणि टेलिग्राम चॅनेल (Telegram Channel) चालकांना धमक्या आणि नोटिसा देणे पुणे पोलिसांनी थांबवावे. नोटिसा द्यायच्याच असतील तर मला द्या. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असल्याने कितीही नोटिसा द्या, परवानगी नाकारा, दबाव टाका किंवा कटकारस्थाने रचा… विद्यार्थ्यांचे आंदोलन होणार म्हणजे होणारच,” असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. हे आंदोलन २७ सप्टेंबर रोजी सकाळी नियोजित वेळेत पुण्याच्या एस. एम. जोशी मार्गावर होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

रोहित पवारांची पोस्ट..

हेही वाचा..

‘निवडणूक आयोग स्वायत्त असायला हवा, हे आता पुस्तकापुरतंच’:राज ठाकरेंचा हल्लाबोल, ‘मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याशिवाय पर्याय नाही’

‘इंडियन एक्स्प्रेस’ने निवडणूक आयोगातील (ECI) अंतर्गत वादाबाबत केलेल्या खळबळजनक खुलाशानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि भाजप सरकारवर अत्यंत सडकून टीका केली आहे. गेल्या १० महिन्यांत दोन निवडणूक आयुक्तांनी १४ वेळा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभारावर आक्षेप नोंदवल्याचा अहवाल समोर आल्यानंतर, राज यांनी निवडणूक आयोगावर थेट ‘मॅच फिक्सिंग’चा गंभीर आरोप केला आहे. तसेच, मनमानी कारभार करणारे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आणि त्यांना हाताशी धरून सत्तेत आलेल्या सरकारने तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.