ज्ञानेश कुमार हे केंद्रीय गृहमंत्र्यांचे छोटा शकील आहेत, मग इतरांना काय म्हणायचे ते तुम्ही ठरवा. पण अमित शहांच्या निवडणूक आयोगातील छोटा शकीलकडून लोकशाहीची हत्या करण्याचे काम सुरू आहे, त्यांना राजीनामा देत घरी जावे लागेल, असे खासदार संजय राऊत यांनी म्
.
संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्याविरोधात निवडणूक आयोगातच बंड झाले आहे हे काही साधे बंड नाही. हे सरकारचे प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत, ते पारदर्शकपणे काम करत नाहीत. बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र या तिन्ही निवडणुका भाजप जिंकू शकला तो फक्त ज्ञानेश कुमार यांनी केलेल्या कारनाम्यामुळे. उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी यांनी मागणी केली आहे की तिन्ही राज्यातील निवडणूक पुन्हा घेण्यात यावी. कारण इथे निवडणूक झालेलीच नाही निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या माध्यमातून भाजपने किंवा शिंदे गटाने महाराष्ट्रात निवडणुकीचा अपहार केला तो लोकशाहीसाठी घातक आहे. देशाचे शत्रु कोण असेल तर सर्वांत पहिला ज्ञानेश कुमारांचे नाव आहे. ते अमित शहांसाठी काम करत आहेत.

निवडणूक आयोगामध्ये माफिया रॅकेट
संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगामध्ये एक माफिया रॅकेट चालवले गेले. निवडणूक आयोग हा लोकशाहीचा कत्तलखाना आहे. हा कत्तलखाना बंद करायचा असेल तर सर्व विरोधकांनी एकत्र येत रस्त्य्यावर उतरले पाहिजे. ज्ञानेश कुमार यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही.त्यांच्याविरोधात आम्ही संसदेत बडतर्फ करण्यासाठी प्रयत्न केले पण तिथेही भाजप आणि संघाचा माणूस बसलेला आहे.
ज्ञानेश कुमार गृहमंत्र्यांचे शार्प शूटर
संजय राऊत म्हणाले की, ज्ञानेश कुमार नावाचा माणूस हा घटनात्मक पदावर बसलेला माफिया आहे. त्यांचे बॉस म्हणजे केंद्रीय गृहमंत्री आहेत. देशात निवडणूक आयोग राहिलेला नाही. मतभेद असण्याचा अर्थ 13 कोटी लोकांची नावे डिलिट करणे असा होत नाही. 3 लोकांचा आयोग का तयार करण्यात आला आहे? दोघांचा विरोध असताना नावे डिलीट करण्यात आली. 10 महिन्यात दोन निवडणूक आयुक्तांनी आक्षेप घेतले आहेत. ज्ञानेश कुमार हा माणूस गृहमंत्र्यांचा शार्प शूटर छोटा शकिल आहे मग त्यांचा बॉस कोण आहे समजून घ्या, असे म्हणत गृहमंत्री अमित शहा यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.
अमित शहा कुठे आहेत?
संजय राऊत म्हणाले की, अमित शहा यांनी स्वत:ला कुठेतरी कोंडून घेतले आहे. देशभरात विष पसरवल्यानंतर शहांना विषबाधा झाली आहे. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाही असे म्हणणारे भाजपच्या नेत्यांना हजारो तरुण दिल्लीत दाखल झाल्यावर प्रधानांचा राजीनामा द्यावा लागला. गृहमंत्र्यांच्या छोटा शकीलला संरक्षण देण्यासाठी एक बिल पास करण्यात आले. अमित शहा यांच्या छोट्या शकीलला राजीनामा देत घरी जावे लागेल.
हे ही वृत्त वाचा
निवडणूक आयोगाकडून ‘मॅच फिक्सिंग’!:राज ठाकरेंचा हल्लाबोल, ‘मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याशिवाय पर्याय नाही’

‘इंडियन एक्स्प्रेस’ने निवडणूक आयोगातील (ECI) अंतर्गत वादाबाबत केलेल्या खळबळजनक खुलाशानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि भाजप सरकारवर अत्यंत सडकून टीका केली आहे. वाचा सविस्तर