Headlines

मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करा:हिंगोलीत काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, पुतळा दहनाने वातावरण तापले




निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना बडतर्फ करावे यासह इतर मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी ता. 28 हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाचे जेष्ठ नेते जकी कुरेशी, सुरेश सराफ, जिल्हाध्यक्ष डॉ. सतीष पाचपुते, मिलींद उबाळे, डॉ. रमेश शिंदे, भगवान खंदारे, शेख जुबेर, संतोष राजेगोरे, नंदकुमार पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्याविरोधात घोषणाबाजी केली. लोकशाही व्यवस्थेत निवडणुका पारदर्शकपणे पार पडण्याचे काम निवडणूक आयोगाचे आहे. मात्र मागील काही वर्षापासून निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या हातातील बाहुले बनले बनले असून निवडणूक आयोग भाजपासाठी निवडणूकीत मॅच फिक्सींग करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेद उघड झाल्याने आयोगातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. एसआयआरच्या नावाखाली मोठ्या संख्यनेने मतदारांची नावे वगळली जात असून हे लोकशाही साठी घातक असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश्‍कुमार हे एकतर्फी निर्णय घेत असल्याचे त्यांचे सहकारी असलेल्या दोन्ही निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमारे हे हुकुमशाह पध्दतीचे असून पश्‍चिम बंगाल निवडणूकीच्या वेळी 92 लाख मतदार वगळले, बिहारमध्येही लाखो मतदार वगळण्यात आले तर महाराष्ट्रात 2024च्या निवडणूकीत 47 लाख बोगस मतदार वाढविल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचा राजिनामा घेऊन त्यांना पदावरून बडतर्फ करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यामागणीचे निवेदनही प्रशासनामार्फत शासनाकडे पाठविण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *