![]()
अभिजीत दिपके सांगत होते मी दलित आहे, मला आश्चर्य वाटले की आयआयटी बॉम्बेमध्ये एक दलित मुलगा आत्महत्या करतो त्या प्रकरणावर हे काही बोलत नाही. हे दलित आहेत ना? मग का शांत बसले हा माझा प्रश्न आहे? असा सवाल साहिल वाकोडे प्रकरणी आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी करत दिपकेंवर निशाणा साधला आहे. सचिन खरात म्हणाले की, अभिजीत दिपके समजाला वळून पाहत नाही तो गद्दार आहे. तो दलित विरोधी आहे हे माझे पहिले मत आहे. साहिल वाकोडे या दलित विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी अभिजीत दिपकेमूग गिळून शांत बसले असून त्यांनी याप्रकरणी कोणतीही मोर्चेबांधणी किंवा आंदोलन केले नाही.परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड झाली आणि दलित विद्यार्थ्यांना पाण्यासाठी त्रास दिला जात असताना दिपकेकुठे लपून बसले होते? असा सवाल त्यांनी केला आहे. दलितांवर होणारे अन्याय अत्याचार त्याला दिसत नाही का? असेही खरात यांनी म्हटले आहे. उपोषण म्हणजे अराजकतेचे राजकारण सचिन खरात म्हणाले की, अभिजीत दिपके हा आपमध्ये काम करत होता. काम करत असताना नौकरी शोधण्यासाठी बाहेर देशात गेला. देशात दलितांवर अत्याचार होत असताना त्याला पक्ष स्थापन करावा वाटला नाही. हा नौटंकी करणारा दिपके आहे. एक दलित मुलगा जातो त्यांना निवडणूक आयोगाचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो, अभिजीत दिपकेपक्ष काढून सत्तेत येणार का? हे केजरीवाल यांच्या विचारधारेचे पिल्लू आहे. उपोषण सोनम वांगचुक यांनी उपोषण केले म्हणून ते आंदोलन यशस्वी झाले, दीपकेमुळे नाही. उपोषण म्हटले की मला पुणे करार आठवतो, महात्मा गांधींनी उपोषण केले आणि आम्हाला पुणे करार करावा लागला. उपोषण करणं चुकीचे आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा दाखला देत, उपोषण म्हणजे अराजकतेचे राजकारण आहे. राज ठाकरे जातीयवादी सचिन खरात म्हणाले की, राज ठाकरे हे जातीयवादी आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की जातीयवाद आणू नका, पण एक मराठी मुलगा अमराठी शिक्षकामुळे आत्महत्या करतो त्यावेळी मराठीवरचे प्रेम कुठे जाते असा सवाल खरात यांनी केला आहे. राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे 2000 सालापासून नव्हे, तर महाराष्ट्रात खरा जातिवाद शिवसेनेपासून सुरू झाला. बाळासाहेब ठाकरे यांनी विद्यापीठाच्या नावाला विरोध केला होता. शिवसेनेचे महापौरपद जोशी, मुख्यमंत्रीपद जोशींना देण्यात आले होते. राज ठाकरेंनी वाकोडे प्रकरणी आंदोलन का केले नाही. हे ही वृत्त वाचा ज्ञानू मस्ट गो! – दिपके:मुंबई पोलिसांची परवानगी नाकारली, तरी CJP ची 2 ऑक्टोबरला शिवाजी पार्कात ‘जेल भरो’ आंदोलनाची घोषणा
मुंबई पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या 2 ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क येथे होणाऱ्या आंदोलनाला परवानगी दिली नाही. हे आंदोलन निवडणूक आयोग (ECI) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात होणार होते. पोलिसांनी उच्च न्यायालयाचे निर्देश, BMC ची परवानगी नसणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता यांचा हवाला दिला. वाचा सविस्तर
Source link
अभिजीत दिपके साहिल वाकोडे प्रकरणावर का बोलत नाहीत?:तो गद्दार अन् दलितविरोधी, हे केजरीवालांच्या विचारधारेचे पिल्लू- सचिन खरात