Headlines

मोताळा:जुन्या वादातून डोक्यात घातली कुऱ्हाड




जुन्या वादातून डोक्यात कुऱ्हाड मारून एका जणास गंभीर जखमी केल्याची घटना २९ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गुळभेली ते रोहिनखेड मार्गावर घडली याप्रकरणी ३० जुलै रोजी रात्री धामणगाव बढे पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील खामखेड येथील वैष्णवी पुंडलिक पिसे यांनी धामणगाव बढे पोलीसात फिर्याद दिली आहे की २९ जुलै रोजी फिर्यादीचा पती पुंडलिक गणेश पिसे हा रोहिनखेड येथील दुध डेअरीवर दुध पोहोचवून दुचाकीने घरी खामखेड परत येत असतांना सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गुळभेली ते रोहिनखेड मार्गावर गुळभेली शिवारातील नदीच्या पुलाजवळ गावातीलच गणेश नामदेव वायाळ या युवकाने पुंडलिक पिसे याची दुचाकी थांबवून जुन्या किरकोळ वादातून जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात कुऱ्हाड मारून गंभीर जखमी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *