Headlines

राऊत पीडित महिलांसोबत की भोंदू बाबासोबत?:बिल्डरांना रेड कार्पेट टाकणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, मविआने अडीच वर्ष स्मारकाचं काम ठप्प ठेवले- नवनाथ बन




भोंदू बाबा खरातनंतर संजूबाबा राऊत हे रोज खोटे बोलण्याचा धंदा सुरू केला आहे. अंजली दमानियांना कुठून माहिती मिळाली याचा तपास सुरू आहे. कुणाला फोन केला म्हणून कोणी लगेच दोषी होत नसतो, राऊत तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? भोंदू खरात की ज्या पीडित महिला आहेत त्यांच्या हे पहिले स्पष्ट करा, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, भोंदू बाबा खरातशी कोणी बोलत असेल त्यांचे नाव समोर आले असेल तर तुम्हाला चिंता कशाला? भोंदू बाबा खरातला मदत करण्याचे काम संजय राऊत आणि मविआच्या सरकारने केले आहे. तुमच्याच सांगण्यावरुन खरात यांना मविआ सरकारने मदत करत पाणी दिले.आपले फोन रेकॉर्ड समोर येऊ नये म्हणू देवाभाऊंमुळे गडचिरोलीत विकास नवनाथ बन म्हणाले की, गडचिरोलीमधील नक्षलवाद संपवून तिथल्या शेतकऱ्यांना विकासाच्या वाटेवर नेण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ज्या नक्षलवाद्यांनी शेतकऱ्यांना लुटले ते तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला तोच नक्षलवाद हवा होता. आता कोणाकडूनच शेतकऱ्यांना त्रास दिला जात नाही. कोणत्याही खान सम्राटाला पाठिशी घातले जात नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे केले आहे. नक्षल्याच्या तावडीतून गडचिरोली सोडवण्याचे काम देवाभाऊंनी केले आहे. आता या जिल्ह्याचा विकास सुरू आहे. पण तो उद्योजकांसाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी हे सरकारचे धोरण आहे. तुमच्यामुळे इंदू मिलच्या स्मारकासाठी वेळ लागला नवनाथ बन म्हणाले की, मविआच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात इंदू मिलची वीट देखील रचली गेली नाही. अडीच वर्षे मविआचे सरकार असताना काम ठप्प ठेवल्याने स्मारकाच्या कामाला उशिर होत आहे. संजय राऊत एक बोट लोकांकडे दाखवत असताना चार बोट आपल्याकडे आहेत हे लक्षात ठेवा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक भव्य झाले पाहिजे ही संकल्पना देवेंद्र फडणवीस यांनी मांडली ती पूर्ण करण्याचे काम सुद्धा भाजपच करेल. डिसेंबर 2026 पर्यंत हे स्मारक पूर्ण करण्याचा मानस आहे. तुम्ही पैशासाठी या स्मारकांचे काम थांबवले होते, तुम्ही यावर बोलूच नका. राऊत अफवा पसरवू नका नवनाथ बन म्हणाले की, मुंबईतील खेळाची मैदाने ही खेळाडूंसाठीच असतील. इथे कोणत्याही बिल्डरांची घुसखोरी सहन केली जाणार नाही. बिल्डरांच्या गप्पा तुम्ही मारताय, कोरोना काळात बिल्डरांच्या कशा पद्धतीने उधळपट्टी मविआ सरकारने केले हे जनतेने पाहिले आहे. मैदानावर हॉटेल्स उभे केले जात नाही, माहिती घेऊन बोलत जावे, राऊतांनी अफवा पसरवू नये. मैदानावर खेळाडू आणि विद्यार्थ्यांचा अधिकार आहे हे सरकारचे धोरण आहे. बिल्डरांना हे मैदाने देता येत नाही आपण संपादक होता थोडे तपासून घ्या. उद्धव ठाकरे यांच्या काळात अनेक बिल्डरांना जागा देण्यात आली. तुमचे किती बिल्डरसोबत संबंध आहेत हे जर सांगितले तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *