Headlines

राजस्थानात उभ्या ट्रकला धडकली क्रूझर, 9 ठार:सर्वजण एकाच कुटुंबातील; 36 जण 3 गाड्यांतून खाटूश्यामजीहून येत होते परत




कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी मध्यरात्री १ वाजता भरधाव क्रूझरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागच्या बाजूने धडक दिली. या अपघातात क्रूझरमधून प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला. मृतांत काही मुलांचाही समावेश होता. या दुर्घटनेत ट्रक चालकासह ७ जण जखमी झाले आहेत. हा अपघात नाता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंभूपुरा गावाजवळ रात्री १ वाजता झाला. मृतदेह आणि जखमी वाहनात अडकले होते. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून न्यू मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवले. एसपी तेजस्वनी गौतम यांनी सांगितले की, क्रूझरमधील सर्वजण धुळे (महाराष्ट्र) येथील रहिवासी आहेत. ते खाटूश्यामजींचे दर्शन घेऊन परतत होते. क्रूझरमध्ये एकाच कुटुंबातील १५ जण प्रवास करत होते. त्यात मुलांचाही समावेश होता. या अपघातात सज्जन (६२) आणि त्यांच्या पत्नी उषा बाई (६०), सुशीला (६२), कैलाश (३५) व त्यांच्या पत्नी अनीता (३४), सानवी (३), बाबूलाल (७५), जाह्नवी (७) आणि माधवी (३२) यांचा मृत्यू झाला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *