Headlines

राजापूरमध्ये 75 व्यक्तींची कॅन्सर तपासणी‎:डॉ.जयश्री थोरात यांच्या पुढाकारातून कॅन्सर तपासणी




संगमनेर तालुक्यातील महिला व नागरिकांच्या आरोग्य सक्षमीकरता डॉ.जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून विविध गावांमध्ये कॅन्सर तपासणी होत आहे. राजापूर मधील ५१ महिला व २४ पुरुषांनी मोफत कॅन्सर तपासणी केली आहे. एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट व एकवीरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर येथे महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर झाले. यावेळी कारखाना संचालिका सौ. लतिकाताई गायकर,उपसरपंच सोमनाथ हासे, युवक काँग्रेस मुख्य समन्वयक प्रदीप हासे,ॲड. बाबासाहेब गायकर, भास्कर मोहिते, विश्वनाथ हासे, डॉ.सचिन गायकर, उत्तम हासे, भास्कर एखंडे, अनिल कडलग आदी उपस्थित होते. सध्याच्या धावपळीच्या जीवनामुळे कॅन्सरचे वाढते प्रमाण हे चिंताजनक असून संगमनेर तालुक्यातील महिलांत आरोग्याबाबत जागृती निर्माण करताना कॅन्सरच्या मोफत तपासणी या शिबिराच्या माध्यमातून गावोगावी केल्या जात आहे. राजापूर येथे झालेल्या या शिबिरामध्ये ५१ महिला व २४ पुरुषांनी आपली कॅन्सरची तपासणी केली. समन्वयक प्रदीप हासे म्हणाले, डॉ.जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांमध्ये आरोग्य जागृती बरोबर त्यांच्या माध्यमातून मोफत कॅन्सर तपासणी होत आहे. कॅन्सर हा येणाऱ्या पिढीसाठी अत्यंत धोकादायक असून महिलांनी कॅन्सरची तपासणी करणे गरजेचे आहे. काही लक्षणे आढळल्यास त्यावर त्वरित उपाय करता येत असतो म्हणून कॅन्सरला घाबरू नका तर तपासणी करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राजापूर मधील अनेक नागरिक व महिलांनी उस्फूर्तपणे मोफत कॅन्सर तपासणी केली व एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टला धन्यवाद दिले. आम्ही शेतकरी महिला आम्हाला आजार आरोग्य आणि कॅन्सर याबाबत नेहमी भीती वाटते मात्र डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी ज्यावेळेस त्या राजापूर मध्ये आल्या त्यावेळेस महिलांशी आरोग्याबाबत मनमोकळा संवाद साधला. ज्या कॅन्सरची भीती वाटत होती त्याबाबत त्यांनी सांगितले त्यांच्या सांगण्यावरून आम्ही तपासणी केली असून आम्हाला मोफत तपासणी मधून निदान झाले आहे.यामुळे कॅन्सरची भीती केली असून सर्व महिलांनी कॅन्सर तपासणी करून घ्यावी, असे आवाहन मनीषा हासे यांनी केले. राजापूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मध्ये कॅन्सर तपासणी शिबिर संपन्न झाले याप्रसंगी ग्रामस्थ व डॉक्टर.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *