![]()
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोअर कमिटीच्या मॅरेथॉन बैठकीत आगामी राजकीय लढाईची दिशा निश्चित करण्यात आली. सुमारे चार तास चाललेल्या या बैठकीत “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, मतदार याद्यांमधील कथित गैरव्यवहार, महागाई, बेरोजगारी आणि एमपीएससी पेपरफुटी यांसारख्या विविध जनहिताच्या मुद्द्यांवरून महायुती सरकारविरोधात राज्यव्यापी रान उठवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला युवा आमदार रोहित पवार अनुपस्थित राहिल्याने आणि त्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “ज्या योजनेच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी निवडणुका जिंकल्या त्याच लाडकी बहीण योजनेतून ऐन रक्षाबंधनाच्या तोंडावर सुमारे १ कोटी भगिनींची नावे परस्पर वगळून सरकारने जनतेची उघड फसवणूक केली आहे. पक्षाची १० प्रवक्त्यांची टीम मैदानात सरकारविरोधात पक्षाची भूमिका अधिक आक्रमकपणे मांडण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने १० अधिकृत प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये डॉ. जितेंद्र आव्हाड, क्लाइड क्रास्टो, भीमराव हत्तीअंबिरे, महेबूब शेख, फैजल मिर्झा आणि प्रवीण पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रोहित पवारांची अनुपस्थिती; राऊतांचे सूचक विधान कोअर कमिटीच्या बैठकीला आमदार रोहित पवार गैरहजर राहिल्यामुळे अंतर्गत नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर खासदार संजय राऊत यांनी, “रोहित पवार इतरत्र उपस्थित राहतात, पण पक्षाच्या बैठकीला नसतात; चांगल्या नेत्यांचे काँग्रेसमध्ये स्वागतच आहे,’ असा टोला लगावला. त्यावर आव्हाड यांनी स्पष्टीकरण देत, “रोहित पवार पूर्वनियोजित वैयक्तिक कामासाठी परदेशात असल्याने त्यांनी रीतसर पूर्वपरवानगी घेतली आहे,’ असे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
Source link
राज्यामध्ये एक कोटी लाडक्या बहिणींना योजनेमधून डावलले:राष्ट्रवादी श.पच्या कोअर कमिटीच्या मॅरेथॉन बैठकीत रणनीती निश्चित