Headlines

रोटरी क्लबचा उपक्रम:ढोरकीन जि. प. शाळेला प्रोजेक्टर संच व कंपोस्ट ड्रम भेट




सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रोटरी क्लबच्या वतीने येथील जिल्हा परिषद हायस्कुलला डिजिटल शिक्षणासाठी एक प्रोजेक्टर संच, तर कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मितीसाठी दोन कंपोस्ट ड्रम भेट देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी मिळण्यासोबतच कचरा व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष धडे मिळणार आहेत. शाळेत आयोजित विशेष कार्यक्रमात हे साहित्य अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी रोटरी क्लबचे एजी भारत चोपडे, स्वाती स्मार्थ, भालचंद्र अत्रे, हसमुख सोमय्या, माजी अध्यक्ष गोपाळ जगताप, उपाध्यक्ष तथा प्रोजेक्ट चेअरमन गजानन आवारे, रघुनाथ चन्ने, जालिंदर फलके, संदीप लोहारे, चंद्रकांत अंबिलवादे, कृष्णा मुळे, सतिश श्रीसुंदर, मुख्याध्यापक राजेंद्र कोलते यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहित्य वाटपानंतर मुख्याध्यापक राजेंद्र कोलते यांनी कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकचे दुष्परिणाम आणि डिजिटल शिक्षणाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. मध्यान्ह भोजनातील ओला कचरा व पालापाचोळा यांपासून कंपोस्ट ड्रमच्या साहाय्याने उत्तम सेंद्रिय खत तयार केले जाईल, असे त्यांनी नमूद केले. ढोरकीन शाळेस रोटरी क्लबतर्फे प्रोजेक्टर संच व कंपोस्ट ड्रमची भेट देताना पदाधिकारी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *