![]()
अवघ्या तीन महिन्यांपुर्वी लग्न झालेल्या एका नवदाम्पत्यासाठी अमरावतीवरुन पुण्याकडे जाणारी खासगी बस काळ बनली. या बसने दिलेल्या धडकेत नवदाम्पत्याच्या स्वप्नांची क्षणात राखरांगोळी झाली. पाळा येथील हे नवदाम्पत्य दुचाकीने वलगाववरुन पाळा येथे जाण्यासाठी अमर
.
बडनेरालगतच्या पाळा येथील पुरण कौशल कोठार (वय २९) आणि त्यांची पत्नी वैष्णवी पुरण कोठार (वय २७) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नवदाम्पत्याचे नाव आहे. विशेष म्हणजे अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच १० फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांचे लग्न झाले होते. वैष्णवी यांचे माहेर वलगाव आहे. एका लग्न समारंभासाठी वैष्णवी व पुरण हे आठ दिवसांपुर्वीच वलगावला गेले होते. दरम्यान गुरुवारी सायंकाळच्या सुमारास हे दाम्पत्य वलगाववरून नवीन, उर्वरित, पान.४ अमरावती ते बडनेरा एक्सप्रेस हायवेवरील वडूरा लेन कटींग हा ब्लॅक स्पॉट ठरत आहे. दोन वर्षांपुर्वी या ठिकाणी जीवघेणा अपघात झाला होता. तसेच मागील अडीच वर्षांत सात ते आठ किरकोळ अपघात झाले आहेत. वास्तविकता अमरावतीवरुन एक्सप्रेस हायवेने जाणाऱ्या वाहनचालकांसाठी बडनेरा नविनवस्ती भागात जाण्यासाठी हाच मार्ग सोईचा आहे. यावेळी लेन क्रॉस करुन वाहनांना जावे लागते. त्याचवेळी अकोलाकडून नागपूरकडे जाणारी वाहन वडूरा पुलावरुन भरधाव येतात, कारण उतार आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता फार जास्त आहे. या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी अमरावतीवरुन बडनेरा जाताना पुलाच्या डाव्या बाजूने सर्व्हिस रस्ता तयार केल्यास वाहने पुलाखालून जातील. पुरण कोठार यांच्या कुटुंबात तेच कर्ते होते. पुरण त्यांच्या पत्नी वैष्णवी व आई असे तिघेच होते. पुरण हे खासगी कंपनीत काम करत होते. या अपघातात पुरण व त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. अवघ्या तीन महिन्यांपुर्वी लग्न झालेल्या तरुण मुलाचा व सुनेचा मृतदेह पाहून पुरण यांच्या आईचा आक्रोश ह्दय पिळवटणारा होता. शुक्रवारी या नवदाम्पत्यावर अंत्यसंस्कार झालेत.
आक्रोश ह्दय पिळवटणारा
‘एनएचए’सोबत पत्रव्यवहार करणार; मार्गही काढणार ^वडूरा लेन कटींग पॉइंटवर अपघात थांबवण्यासाठी वडूरा पुलाखालून वाहतूक होणे गरजेचे आहे. त्यासाठी पुलाच्या डाव्या बाजूने सर्व्हिस मार्ग तयार करणे आवश्यक आहे. सर्व्हिस मार्ग तयार करण्यासाठी आम्ही तातडीने एनएचएसोबत पत्रव्यवहार करणार आहे. – यशवंत सोळंके, पोलिस अधिक्षक, महामार्ग सुरक्षा, नागपूर.