Headlines

लासलगाव बाजार समिती सभापती आणि उपसभापती निवड 11 जुलैला:सभापतिपदासाठी जयदत्त होळकर यांचे नाव चर्चेत‎




लासलगाव लासलगाव बाजार समिती सभापती व उपसभापती पदाकरिता दि. ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता संचालक मंडळाची बैठक होणार आहे. सभापती पदासाठी जयदत्त होळकर यांचे नाव चर्चिले जात आहेत. तत्कालीन सभापती डी. के. जगताप व उपसभापती संदीप दरेकर यांनी आवर्तन पद्धतीनेनुसार पदांचे राजीनामे दिल्यानंतर आता ही निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. बैठकीसाठी निफाडचे सहाय्यक निबंधक कांतीलाल गायकवाड हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. होळकर – क्षीरसागर, जगताप‌ – थोरे या दोन गटात निवडणूक झाली होती. निवडीनंतर सत्ताधारी गटाकडून पहिल्यांदा बाळासाहेब क्षीरसागर यांची वर्णी लागली होती, त्यानंतर दोन विरोधी गटातील प्रमुख नेते एकत्र आल्याने दुसऱ्यांदा सभापतिपदी डिके जगताप हे विराजमान झाले होते. तर पुढचे सभापती जयदत्त होळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. विरोधी गट ऐनवेळी काय भूमिका हे पण महत्त्वपूर्ण आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी दोन्ही गटांना एकत्र करत सलग दोन्ही निवडी वेळा एका गटाचा सभापती आणि दुसऱ्या गटाचा उपसभापती केला होता. सध्या दोन्ही गटातील अनेक संचालक काही इकडे तर काही तिकडे अशी परिस्थिती आहे त्यामुळे संख्याबळ महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. मंत्री भुजबळ उपस्थित राहणार: निवड प्रक्रिये वेळी दोनही गटात कुठलाही वाद न होता ठरल्याप्रमाणे निवड व्हावी, या अनुषंगाने मंत्री भुजबळ उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. गत उपसभापती निवडी वेळी डॉ. श्रीकांत आवारे यांचे नाव निश्चित झालेले असताना ऐनवेळी सत्ताधारी व विरोधकांमध्ये वाद होवू, नये म्हणून दरेकर यांची नियुक्ती झाली होती. त्यावेळी नाराज झालेले डॉ. श्रीकांत आवारे हे भुजबळांचे समर्थक असल्याने आता तरी डॉ. आवारे यांच्या गळ्यात उपसभापती पदाची माळ पडणार का याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *