Headlines

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या बदलीविरोधात आंदोलन:पुण्यातील भारती विद्यापीठ चौकीसमोर नागरिक, व्यापारी, लोकप्रतिनिधींचा सहभाग




पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या तातडीच्या बदलीविरोधात शुक्रवारी भारती विद्यापीठ पोलिस चौकीसमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात आंबेगाव आणि कात्रज परिसरातील नागरिक, व्यापारी, लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी मानव अधिकार समितीच्या भूमिकेचा निषेध करत घोषणाबाजीही करण्यात आली. आंदोलनात युवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब चोरगे, नगरसेविका प्रतिभाताई चोरगे, नगरसेवक संदीप बेलदरे, माजी नगरसेवक वसंत तात्या मोरे, संतोष फरांदे, महा मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, उद्योगपती शंकरशेठ कडू, माजी पंचायत समिती सदस्य दादासाहेब कोंढरे, हिंदू नवभारत विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष हेमंत निंबाळकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. विजय धुमाळ, भानुदास कोंढरे, अमर पवार, दत्तात्रेय वीर, आप्पा पवार, संजीवनी जाधव, शर्मिला योगेश गिरी, भगवान खुटवड, नाना निवांगुणे, सागर मोझर, शिवसेना नेते पंढरीनाथ खोपडे आणि कॉसमॉस बँकेचे संचालक बाळकृष्ण भोसले यांचाही यात समावेश होता. आंदोलकांनी मानसिंग पाटील यांनी परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी काम केल्याचे सांगितले. त्यांची अचानक बदली झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. कोणत्याही ठोस कारणाशिवाय झालेली ही बदली रद्द करून त्यांना पुन्हा भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात नियुक्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. निदर्शनानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाने भारती विद्यापीठ पोलिस चौकीत निवेदन सादर केले. याच आशयाचे निवेदन पुणे शहर पोलिस आयुक्तांनाही देण्यात आले. परिसरातील नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाने या प्रकरणाचा पुनर्विचार करावा, अन्यथा पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *