![]()
नागपूर-मुंबई या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एनएच ७५२-१ वर वैजापूर तालुक्यातील बोरदहेगाव येथील उगले वस्तीजवळील धोकादायक वळणावर टोमॅटोने भरलेला आयशर (एमएच १६ केएस १३०४) पलटी होऊन अपघात घडला. नाशिककडून बिडकीनकडे जाणारा हा ट्रक गुरुवारी पहाटे चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने उलटला. यात चालक किरकोळ जखमी झाला असून, ट्रकचे व टोमॅटोचे नुकसान झाले आहे. रस्त्यावर सर्वत्र टोमॅटोचा सडा पडून लाल चिखल झाला होता. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. महामार्गावर वैजापूर ते लासूरस्टेशन दरम्यान राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून दिशादर्शक फलक, रेडियम प्लेट किंवा काळे-पिवळे पट्टे आखण्यात आलेले नाहीत. तसेच गाव व चौकांच्या ठिकाणी गतिरोधक नसल्याने चालकांना अंदाज येत नाही. संबंधित विभागाने आवश्यक ठिकाणी गतिरोधक, रेडियम फलक बसवण्याची मागणी होत आहे. सूचना फलकांचा अभाव महामार्गावर वैजापूर ते लासूरस्टेशन दरम्यान राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून दिशादर्शक फलक, रेडियम प्लेट किंवा काळे-पिवळे पट्टे आखण्यात आलेले नाहीत. तसेच गाव व चौकांच्या ठिकाणी गतिरोधक नसल्याने चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. बोरदहेगाव ते करंजगाव या २ किलोमीटर अंतरात तीन धोकादायक वळणे असून, सतत अपघात होत आहेत.
Source link
वळणाचा अंदाज न आल्याने टोमॅटोचा आयशर उलटला:चालक जखमी, नाशिकहून बिडकीनकडे जाताना अपघात, बोरदहेगावच्या उगले वस्ती येथील घटना