Headlines

वसमतमध्ये 19 गोवंश जप्त प्रकरण:राष्ट्रवादीच्या उपनगराध्यक्षांवर गुन्हा, राजकीय वातावरण तापले




वसमतच्या जवळा खंदारबन शिवारातील १९ गोवंश प्रकरणात थेट उपनगराध्यक्षांवरच गुन्हा दाखल झाल्याने राजकिय वर्तुळात खळबळ उडली आहे. सकल हिंदू समाजाच्या मोर्चामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याची प्रतिक्रिया उपनगराध्यक्ष इमरानअली यांनी दिली आहे. वसमतच्या जवळा खंदारबन शिवारात वसमत ग्रामीण पोलिसांनी शेतात टाकलेल्या छाप्यामध्ये तब्बल १९ गोवंश ताब्यात घेण्यात आली. चारा पाण्याविना ही जनावरे बांधल्याचे दिसून आले असून त्या ठिकाणी अतिशय दलदल होती. सदर गोवंश कत्तलीसाठी नेली जात असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यावरून पोलिसांनी वसमतचे राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष सय्यद इमरानअली यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली असून हिंदू संघटनांमधून तिव्र असंतोष निर्माण झाला आहे. या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करावी तसेच मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करीत सकल हिंदू समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आला. तर भाजपाच्या वतीनेही निवेदन देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून यामध्ये आणखी कोणाचा हात आहे का? हे शोधून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्या गुन्हयाशी आपला संबंध नाही: सय्यद इमरान अली, उपनगराध्यक्ष वसमत वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल गुन्हाशी आपला कोणताही संबंध नाही. केवळ राजकिय हेतू साध्य करण्यासाठी व विरोधकांच्या महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपले नाव ओढले गेले आहे. प्रशाकिय आणि कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर करून आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न आहे. सत्य निश्‍चित समोर येऊन आपले निर्दोषत्व सिध्द होईल असा विश्‍वास आहे. आपल्या विरोधात पसरविलेल्या अफवांवर विश्‍वास ठेऊ नये.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *