Headlines

वाढदिवसाच्या पार्टीतील वादातून गोळीबार:नागपूरच्या मानेवाड्यात 17 वर्षीय मुलाच्या डोक्यात गोळी; एम्समध्ये उपचार सुरू




नागपूरच्या मानेवाडा परिसरात वाढदिवसाच्या पार्टीतील वादातून मंगळवारी, २४ नोव्हेंबरला गोळीबार झाला. यात १७ वर्षीय मुलाच्या डोक्यात गोळी लागली. त्याची प्रकृती चिंताजनक असून एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. प्राथमिक माहितीनुसार, पार्टीसाठी जमलेल्या तरुणांमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला आणि नंतर एका गटातील व्यक्तींनी गोळीबार केल्याची माहिती आहे. गोळी लागल्यानंतर जखमी मुलाला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि तपास सुरू केला. प्राथमिक तपासात गोळीबारात तिघांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. संशयितांची ओळख पटवून त्यांची भूमिका तपासली जात आहे. पार्टीत वाद कशामुळे झाला, गोळीबार कोणी केला आणि यामागे जुना वाद होता का, याचा पोलीस तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *