Headlines

Controversy Over Latur Proposal Allocation


लातूर येथील एका प्रस्तावापोटी 5 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा अवमान केल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांचा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी बुधवारी (25 नोव्हेंबर) आक्रम

.

10 कोटींच्या पुढील फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाते; 2 वर्षांत एकतरी 25 कोटींचा प्रस्ताव दाखवून द्या!

संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन 25 कोटींच्या प्रस्तावावरून केलेल्या आरोपांची शिरसाट यांनी तांत्रिक व प्रशासकीय चिरफाड केली. सामाजिक न्याय मंत्री म्हणून मला केवळ 10 कोटी रुपयांपर्यंतचेच वित्तीय अधिकार आहेत. 10 कोटींच्या वरील प्रत्येक फाईल अंतिम मंजुरीसाठी माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाते. गेल्या 2 वर्षांत मी एकतरी 25 कोटींचा प्रस्ताव मंजूर केल्याचे राऊतांनी पुराव्यानिशी दाखवून द्यावे. सर्व शासकीय रेकॉर्ड माहितीच्या अधिकारात उपलब्ध आहे; खोटा प्रस्ताव करून स्वतःला फासावर लटकवून घ्यायला मी मूर्ख नाही.

30000 गरीब कुटुंबांचे अर्ज प्रलंबित असताना एका व्यक्तीला 25 कोटी कसे देणार?

माझ्या विभागांतर्गत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडे गरीब व गरजू तरुणांचे 1 लाख, 2 लाख आणि 5 लाख रुपयांच्या कर्जाचे तब्बल 30000 अर्ज प्रलंबित आहेत. केंद्राकडून निधी नसल्याने मला त्या गरिबांना 1 ते 5 लाखांचे कर्ज देता येत नाही; अशा स्थितीत एकाच व्यक्तीचा 25 कोटींचा प्रस्ताव मंजूर करून जनतेच्या पैशांची उधळपट्टी मी कशी करू देणार?

तक्रारदार उदगीरकर यांनी 2024 ची लोकसभा लढवली

पत्रकार परिषदेत तक्रारदार नरसिंग उदगीरकर यांना बाजूला बसवून घेतल्यावरून शिरसाट यांनी राऊतांना आरसा दाखवला आणि उदगीरकर यांची ऑडिओ क्लिप ऐकवली. तक्रारदार नरसिंग उदगीरकर हे लातूरचे असून त्यांनी 2024 मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. कालच त्यांनी माझ्या पीएला फोन करून “मला कोणीतरी जाणूनबुजून अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, साहेबांनी माझे कोणतेही काम अडवलेले नाही व पैशांची मागणी केलेली नाही, उलट 100 टक्के सहकार्य केले आहे,” अशी कबुली दिली आहे.

सुषमा अंधारेंना शह देण्यासाठी राऊतांची पत्रकार परिषद

उदगीरकर यांचे हेच व्हॉईस रेकॉर्डिंग सकाळी उबाठा गटाच्या नेत्या सुष्मा अंधारे यांनी ट्वीट केले होते आणि नंतर ते डिलीट केले. सध्या उबाठा गटात सुष्मा अंधारे वरचढ ठरत असल्याने त्यांना शह देण्यासाठी (‘तेरे से एक घर आगे’) संजय राऊतांनी तडकाफडकी संभाजीनगरला येऊन त्याच उदगीरकरांना बाजूला बसवून पत्रकार परिषद घेतली, असा टोला शिरसाट यांनी लगावला.

आम्हाला अण्णाभाऊ साठे शिकवू नका

या प्रकरणाचा संबंध साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्याशी जोडल्याबद्दल शिरसाट यांनी राऊतांवर संताप व्यक्त केला. कोणीतरी महापुरुषांच्या नावाचे लेटरहेड वापरून प्रस्ताव दिला आणि तो मंजूर झाला नाही, तर त्याचा संबंध थेट अण्णाभाऊ साठे यांच्याशी जोडून महामानवांची बदनामी करणे हा कोणता नवीन जावईशोध राऊतांनी लावला आहे? तुमच्या पक्षप्रमुखांनी अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेला कधी हार घातल्याचा एकतरी फोटो दाखवावा.

सामाजिक न्याय विभागाची ऐतिहासिक कामे

आम्ही त्याच चळवळीतून आलो आहोत. सांगलीतील वाटेगाव येथे आतापर्यंत कोणीही बसवला नव्हता इतका मोठा पुतळा आणि 5 एकर जागेवर तब्बल 50 कोटी रुपये खर्चून (HPC चे 25 कोटी आणि विभागाचे 50 कोटी) देशातील सर्वात भव्य असे अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक आम्ही उभारत आहोत. महाडच्या चवदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी 90 ते 100 कोटी रुपये, वामनदादा कर्डक यांच्या स्मारकासाठी 4.50 कोटी रुपये, विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांसाठी गेल्या वर्षी 1200 कोटी तर यंदा 1500 कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. परवाच पत्नीचे लीलावती रुग्णालयात ऑपरेशन सुरू असतानाही मी बोधगया येथे जाऊन 10 एकर जागेची मागणी केली आणि जात पडताळणी अधिकाऱ्यांची संख्या 4 वरून 34 केली. कामात माझी बरोबरी करण्याची यांची ताकद नाही.

तुमच्या अडीच वर्षांत किती दलित मंत्री होते?

उबाठा गटाच्या नेत्यांना आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करताना शिरसाट यांनी जुन्या जखमांवर बोट ठेवले. आमच्याकडे पैसे नव्हते आणि आमची जात आडवी आली, म्हणून उद्धव ठाकरेंनी आम्हाला मंत्रिमंडळात घेतले नाही. मात्र, पक्षाशी कोणताही संबंध नसलेले अपक्ष शंकरराव गडाख एका दिवसात कॅबिनेट मंत्री झाले! अनिल परब, सुभाष देसाई यांच्यासारख्या ‘चांडाळ चौकडी’ने मलिदा खाण्यासाठी मंत्रिपदे वाटून घेतली. ‘मातोश्री’च्या मागच्या दरवाजातून कसे टेम्पो भरून पैसे आत यायचे, हे राऊतांना चांगलेच माहीत आहे.

उबाठा गटाचा दलितविरोधी चेहरा उघड

1995 च्या सत्तेत किंवा महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या सत्तेत तुमच्या पक्षाकडून दलित किंवा बौद्ध समाजाचा एकतरी मंत्री होता का, त्याचे नाव सांगावे! आज संजय शिरसाट गरीब व दलित समाजासाठी काम करत असल्याने आणि महापालिकेत मीच यांची वाजवली असल्याने, संजय शिरसाटचा राजीनामा घ्यावा असे यांना वाटत आहे; पण मी सगळ्यांना पुरून उरणारा माणूस आहे, अशा शब्दांत त्यांनी आव्हान दिले.

—————————————————

हेही वाचा…

शिरसाटांनी 5 कोटींची लाच मागितली: संजय राऊत यांचा आरोप, म्हणाले- त्यांची 27 प्रकरणे माझ्याकडे, शिंदेंना तोंड दाखवणं अवघड होईल!

लातूरमधील संस्थेच्या 25 कोटींच्या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी समाज कल्याणमधील कामासाठी त्या खात्याच्या मंत्र्यांनी आपल्या 72 व्या मजल्यावरील खासगी घरी बोलावून स्वतः पाच कोटी रुपयांची लाच मागितल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत राऊत यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. रक्कम न दिल्याने प्रस्ताव रखडल्याचा दावा राऊत यांनी केला असून आता या आरोपावर सामाजिक न्यायमंत्री काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.