चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके हे एससी-एसटी (SC, ST) समाजातून येतात, म्हणून त्यांना मोकळेपणाने काम करू दिले जात नाही. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत नव्याने आलेली मंडळी त्यांना विरोध करत आहेत, तर काही लोक इतरांना पुढे करून पालकम
.
आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राज्याच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. चंद्रपूरसाठी आम्हाला आदिवासी समाजाचे उच्चशिक्षित पालकमंत्री मिळाले असून, ते चांगले काम करत आहेत. मात्र, पहिल्या दिवसापासून त्यांना विरोध करण्याची भूमिका काही लोकांनी घेतली आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत नव्याने आलेली मंडळी पालकमंत्र्यांना विरोध करत आहेत.

आमची भूमिका सरकारच्या निर्णयासोबत
किशोर जोरगेवार म्हणाले की, चंद्रपूरचे पालकमंत्री बदलण्याची चर्चा म्हणजे एससी-एसटी समाजातील लोकांना मोकळेपणाने काम करू द्यायचे नाही, असा प्रयत्न आहे. भाजपच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला पालकमंत्री बदलावा असे वाटत नाही. टीम देवेंद्र फडणवीस म्हणून आम्ही काम करत असतो. आमची भूमिका ही सरकारच्या निर्णयासोबत असते, आमची कोणतीही विरोधी भूमिका नसते. काही लोक इतरांना पुढे करून पालकमंत्र्यांना विरोध करत आहेत.
पालकमंत्री अशोक उईके निष्क्रिय, त्यांना तात्काळ हटवा- कासट
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके हे निष्क्रिय असून, त्यांना तात्काळ पदावरून हटवावे, अशी मागणी शिंदेसेनेचे कार्यकर्ते व पालकमंत्री हटाओ कृती समितीचे संयोजक ललित कासट यांनी केली आहे.मागील दोन वर्षांच्या कार्यकाळात पालकमंत्री उईके यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी एकही प्रभावी काम केलेले नाही. ते पाहुण्यासारखे येतात आणि जातात; त्यामुळे ते या पदाला योग्य न्याय देऊ शकत नाहीत, असा आरोप कासट यांनी केला आहे. उईके यांना पालकमंत्री पदावरून हटवण्यात यावे, या मागणीसाठी शहरात स्वाक्षरी अभियान राबवण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा…
समाज कल्याणच्या कामासाठी मंत्र्यांनी 72व्या मजल्यावर 5 कोटींची लाच मागितली: लहान कामांसाठीही मंत्री पैसे मागताय- संजय राऊत

लातूरमधील संस्थेच्या 25 कोटींच्या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी समाज कल्याणमधील कामासाठी त्या खात्याच्या मंत्र्यांनी आपल्या 72 व्या मजल्यावरील खासगी घरी बोलावून स्वतः पाच कोटी रुपयांची लाच मागितल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत राऊत यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. रक्कम न दिल्याने प्रस्ताव रखडल्याचा दावा राऊत यांनी केला असून आता या आरोपावर सामाजिक न्यायमंत्री काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी