राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे कराड येथील प
.

यशवंतराव चव्हाण यांचा फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी विचार घेऊन आम्ही सर्व जण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्राचा संस्कृती आणि परंपरेचा वसा पुढे कसा नेता येईल, या दृष्टीने आम्ही वाटचाल करत आहोत, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर आयोजित कीर्तनाच्या कार्यक्रमादरम्यान सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्या एकमेकांसमोर येऊन नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले. कीर्तनाच्या कार्यक्रमात या दोन्ही नेत्या एकाच व्यासपीठावर शेजारी बसल्याने उपस्थितांचे लक्ष वेधले गेले.

चव्हाणांनी देशाला विकासाची दिशा देण्याचे काम केले
सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या की, यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रासह देशाला विकासाची नवी दिशा देण्याचे काम केले. अजित पवार हे दरवर्षी यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी भल्या पहाटेच येथे येत असत. आम्ही सर्वांनीही आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहिली. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी आणि सहकारासाठी अनेक मंत्र दिले. त्यांचा प्रामाणिकपणा, विकासाची दृष्टी आणि विचारांच्या परंपरेमुळे त्यांनी एक नवा इतिहास घडवला.
हे ही वृत्त वाचा
शरद पवारांकडून गोविंद बागेतील ‘एआय’ ऊस शेतीची पाहणी

शरद पवार हे सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले होते. या चर्चांवर विविध राजकीय नेत्यांनी आपली मते मांडल्यानंतर, आता स्वतः शरद पवार यांनी केलेल्या एका कृतीमुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. वाचा सविस्तर