Headlines

मागील मताधिक्यापेक्षा एक मत जास्त घेऊन जिंकणार:काम केलं असेल तरच मत द्या, अन्यथा देऊ नका- ओमराजे निंबाळकर




2024 च्या निवडणुकीत मी 3 लाख 29 हजार 846 मतांच्या फरकाने निवडून आलो होतो. आता 2029 च्या लोकसभा निवडणुकीत गेल्या वेळपेक्षा किमान एक मत जास्त, म्हणजेच 3 लाख 29 हजार 847 किंवा त्यापेक्षा अधिक मतांच्या फरकाने निवडून येण्याचे चॅलेंज मी स्वीकारत आहे, असे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे. मी हे माझ्या कामाच्या जोरावर बोलत आहे. तुमची कामे केली असतील तरच तुम्ही मला मतदान करा, अन्यथा देऊ नका, असेही त्यांनी म्हटले आहे. ओमराजे निंबाळकर म्हणाले की, 2019 मध्ये मी 1 लाख 29 हजार मतांच्या फरकाने निवडून आलो होतो. त्यानंतर शिवसेना आणि भाजप वेगळे झाल्यावर तुम्ही भाजपच्या जीवावर निवडून आलात अशी टीका माझ्यावर झाली. त्यावेळी मी जनतेच्या जीवावर पुन्हा निवडून येण्याचे चॅलेंज स्वीकारले आणि 2024 च्या निवडणुकीत 3 लाख 29 हजार 846 मतांच्या फरकाने निवडून येत ते करून दाखवले. आता 2029 च्या निवडणुकीत गेल्या वेळपेक्षा एक मत जास्त, म्हणजेच 3 लाख 29 हजार 847 मतांच्या फरकाने निवडून येण्याचे आव्हान आपण स्वीकारले आहे. धाराशिव येथील छायादीप लॉन्स येथे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘खासदार नोकरी महोत्सव 2026’ पार पडला. यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी जोरदार भाषण केले. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून 50 हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांमध्ये विविध शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच, निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. तरुणांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करणार यावेळी बोलताना ओमराजे निंबाळकर म्हणाले की, धाराशिव जिल्ह्यात मोठ्या उद्योगांसह लघु व मध्यम उद्योगांना चालना मिळावी, स्थानिक अर्थव्यवस्था बळकट व्हावी आणि जिल्ह्याची औद्योगिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी, यासाठी राज्याच्या उद्योग विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करणार आहे. आपल्या मतदारसंघातील तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार मिळावा, त्यांच्या कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळावे आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, यासाठी यापुढेही सातत्याने प्रयत्नशील राहणार. हेही वाचा… समाज कल्याणच्या कामासाठी मंत्र्यांनी 72व्या मजल्यावर 5 कोटींची लाच मागितली: लहान कामांसाठीही मंत्री पैसे मागताय- संजय राऊत लातूरमधील संस्थेच्या 25 कोटींच्या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी समाज कल्याणमधील कामासाठी त्या खात्याच्या मंत्र्यांनी आपल्या 72 व्या मजल्यावरील खासगी घरी बोलावून स्वतः पाच कोटी रुपयांची लाच मागितल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत राऊत यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. रक्कम न दिल्याने प्रस्ताव रखडल्याचा दावा राऊत यांनी केला असून आता या आरोपावर सामाजिक न्यायमंत्री काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *