![]()
राज्यात पावसाचा लपंडाव सुरू असतानाच, आता पुन्हा एकदा काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः पुण्याचा घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा मोठा तडाखा बसण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ हवामान खात्याने आज पुण्याच्या घाटमाथ्यावरील परिसरासह विदर्भातील अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाचे आवाहन घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे आणि योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिली होती, मात्र आता विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने नागरिकांना, विशेषत: शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर: पावसाचा खंड, तापमान पोहोचले ३१.८ अंशांवर, पुढील ५ दिवस हलका पाऊस शहरात पावसाने दडी मारल्यामुळे तापमानात लक्षणीय वाढ झाली असून, वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या २४ तासांत शहरात पावसाची नोंद निरंक (००.० मिमी) राहिली. परिणामी, कमाल तापमान सरासरीपेक्षा २.९ अंशांनी वाढून ३१.८ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. किमान तापमान २२.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सकाळी हवेतील आर्द्रता ८७ टक्के, तर सायंकाळी ७२ टक्के असल्याने नागरिकांना घामाच्या धारांनी त्रस्त केले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सोमवार (१० ऑगस्ट) दुपारनंतर किंवा संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. यावेळी ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर ११ ते १५ ऑगस्ट दरम्यान शहरात विनाइशारा ढगाळ वातावरण राहील आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. या काळात कमाल तापमान ३१ ते ३२ अंशांच्या घरात स्थिर राहील. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार १३, १४ आणि १५ ऑगस्ट रोजी कमाल तापमान ३१ अंश आणि किमान तापमान २२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. जळगाव: आज ढगाळ वातावरणासह सायंकाळी तुरळक पाऊस जिल्ह्यात सोमवारी मध्यम पाऊस व ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असली, तरी जोरदार सरींची प्रतीक्षा कायम आहे. जुलैतील समाधानकारक हजेरीनंतर ऑगस्टमध्ये मान्सूनची चाल मंदावली आहे. मान्सून ट्रफ उत्तर भारताकडे सरकल्याने महाराष्ट्रातील प्रभाव कमी झाला असून, एल निनोच्या प्रभावामुळे पावसाने दडी मारलीआहे. रविवारी शहरात अवघ्या दोनमिनिटांचा पाऊस पडला. सध्या मान्सूनचामुख्य प्रभाव दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दिसून येत आहे. अहिल्यानगर: तीन धरणांमध्ये ४१.५३ टीएमसी साठा जिल्ह्यात रविवारी विस्कळीत स्वरुपाच्या हलक्या सरी कोसळल्या,परंतू, हवामान खात्याच्याअंदाजानुसार पुढील काही दिवसपाऊस विश्रांती घेणार आहे. तुरळकठिकाणी हलक्या सरीकोसळण्याचाही अंदाज वर्तवलाआहे. पावसाचा खंड आणखीलांबल्यास पिकांना पाण्याची गरजभासणार असून, पुढील आठ ते पंधरादिवसांत दमदार पाऊस न झाल्यासधरणातून सिंचनासाठी आवर्तन सोडण्याची मागणी जोर धरण्याचीशक्यता आहे. दरम्यान, घाटमाथ्यावरझालेल्या चांगल्या पावसामुळेजिल्ह्यातील मुळा, भंडारदरा वनिळवंडे धरणात एकूण सुमारे ४१.५३टीएमसी जलसाठा झाला आहे. मुळा धरणाची एकूण क्षमता सुमारे२६ हजार दलघफू असून, सध्याधरणात २२ हजार ५४३ दलघफूजलसाठा झाला आहे. त्यामुळे मुळाधरणातील पाणीसाठा क्षमतेच्या सुमारे८६ टक्क्यांवर पोहोचला आहे.भंडारदरा धरणाची एकूण क्षमता ११हजार ३९ दलघफू असून, त्यात १०हजार ७७६ दलघफू (९७.६२ टक्के)पाणीसाठा आहे. निळवंडे धरणाचीक्षमता ८ हजार ३३५ दलघफू असून,धरणात ८ हजार २१२ दलघफू(९८.५४ टक्के) पाणीसाठा झालाआहे. पाणीसाठा समाधानकारकअसला तरी पावसाने विश्रांतीघेतल्याने खरीप हंगामातील पिकांच्यावाढीवर परिणाम होण्याची शक्यताआहे. सध्या सोयाबीन, कापूस, मका,बाजरीसह अन्य पिकांना पावसाचीगरज आहे. पावसाचा खंड आणखीवाढल्यास शेतकऱ्यांना सिंचनाच्यापाण्याची आवश्यकता भासू शकते. हेही वाचा.. एमपीच्या डिंडोरीत सर्व शाळांना सुट्टी: यूपीमध्ये गंगा नदीसह 10 नद्यांना पूर, बिहारच्या 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट मध्य प्रदेशात रविवारी अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू राहिली. मंडला येथे नर्मदा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत होती, तर डिंडोरीमध्ये मुसळधार पावसामुळे सोमवारी नर्सरी ते १२वी पर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. राज्यात सक्रिय मान्सून ट्रफ आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील काही दिवसांत पावसाची नवीन फेरी सुरू होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात सततच्या मान्सूनच्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. गंगा, यमुना, शारदा आणि सरयू यासह १० हून अधिक नद्या धोक्याच्या पातळीजवळून वाहत आहेत. सोमवारी संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता आहे. ललितपूर आणि महोबा येथे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सविस्तर वाचा
Source link
वादळी पावसाचा इशारा:पुणे घाटांसह अकोला-अमरावतीत मुसळधार पावसाची शक्यता; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट