Headlines

वादळी वाऱ्यामुळे केळी, पपई‎जमीनदोस्त; संत्र्याचेही नुकसान‎:चांदूर बाजार तालुक्यात घाटलाडकी, रतनपूर सायखेडा येथे नुकसान‎




प्रतिनिधी । अमरावती/ घाटलाडकी शनिवारी २ मे रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला. ढग दाटून आले, विजांचा कडकडाट सुरू झाला आणि जोरदार वारा सुटला. जिल्ह्यातील काही भागात वादळाचा जोर जास्तच होता. वादळाचा सर्वाधिक फटका चांदूर बाजार तालुक्यातील फळ पिकांना बसला आहे. रतनपूर सायखेडा येथील शेतातील दीड वर्ष झालेल्या केळीच्या बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळामुळे केळीची झाडे तूटून अक्षरश: जमिनदोस्त झालेली आहेत. वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आले आहे. दरम्यान जिल्ह्यात आगामी चार दिवस असेच वातावरण राहणार असून, सोसाट्याचा वारा व पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रतनपूर सायखेडा येथील शेतकरी कुलदीप ढोबळे यांनी दीड वर्षांपूर्वी उर्वरित. पान ४ चांदूर बाजार तालुक्यात शनिवारच्या वादळामुळे प्राथमिक सर्वेक्षणानुसार ५.६५ हेक्टरमधील केळी तर काही प्रमाणात पपईचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. या व्यतिरीक्त जिल्ह्यातील इतर भागातही वादळाने थैमान घातले होते. तसेच काही ठिकाणी हलक्या पावसानेही हजेरी लावली होती. प्रवीणकुमार, हवामान शास्त्रज्ञ, आरएमसी नागपूर. शनिवारी सायंकाळी वादळाने घाटलाडकीसह परिसराला तडाखा दिला. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून काही घरांवरील छप्पर उडाली. वादळामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घाटलाडकीसह परसोडा, नगरवाडी, बेलमंडळी, वारोळी, रेडावा, चिंचकुंभ,सांभोरात वादळी वाऱ्याचा फटका बसला. संत्रा, केळी व पपई उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आंबिया बहरातील संत्री पडल्याने शेतकऱ्यांचा घास हिरावला. वाढत्या उत्पादन खर्चाने आर्थिक संकटातील शेतकऱ्यांसमोर या नुकसानीमुळे नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, शासनाने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *