Headlines

वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त वक्तव्य:निषेध करून तहसीलदारांना दिले निवेदन




राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदाय आणि महाराज मंडळींविरुद्ध केलेल्या वादग्रस्त विधानांचे सिल्लोड तालुक्यात तीव्र पडसाद उमटले. वारकरी परंपरेची जाणीवपूर्वक बदनामी होत असल्याचा आरोप करत समस्त वारकरी संप्रदाय व महाराज मंडळींच्या वतीने तहसीलदार अंकिता दहिभाते यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की, लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी एका विशिष्ट राजकीय पक्षाचा अजेंडा राबवत असल्याचा दावा केला. संप्रदायातील महाराजांना प्रतिगामी संबोधले. आचार्य या पदव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या वक्तव्यांमुळे वारकरी समाजात संतापाची लाट उसळली. महाराज मंडळी राजकीय प्रचार करत असल्याचा दावा पूर्णतः निराधार असल्याचे वारकरी संप्रदायाने स्पष्ट केले. वर्षानुवर्षे चालत आलेल्या पदव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे अल्पज्ञानाचे लक्षण असल्याचे निवेदनात नमूद केले. कीर्तन-प्रवचनांच्या माध्यमातून समाजविघातक वक्तव्ये केली जात असल्याचा आरोप हा संतांच्या मूळ शिकवणीचा अपमान असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. लवांडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना रामेश्वर महाराज, वारकरी संघांचे सचिव कृष्णा लहाने, माणिक महाराज, नामदेव महाराज पल्हाळ, वामन महाराज, अजबराव महाराज मिरगे, सदाशिव शास्त्री मंगरूळकर, दिगंबर दादा, देविदास महाराज मिसाळ, संदीप महाराज काकडे, शिवराम साखळे, दादाराव महाराज राऊत, गणेश महाराज, समाधान महाराज बसंते, भगवान महाराज भोरकडे, नारायण महाराज, पुंडलिक महाराज आदी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *