Headlines

अभिजीत दिपकेंच्या आजीचे निधन:दिपके पोलिसांच्या ताब्यात असतानाच आजीची प्राणज्योत मालवली; कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले




अभिजीत दिपके यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. अभिजीत यांच्या आजीचे दीर्घ आजाराने आज सकाळी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे दिल्लीत अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर दुसरीकडे त्यांच्या आजीच्या निधनाने दिपके कुटुंबावर संकट ओढवले असल्याचे दिसत आहे. अभिजीत दिपके यांच्या आजी हिंगोलीच्या संतुक पिंपरी या त्यांच्या मूळ गावी राहत होत्या. तिथेच त्यांचे निधन झाले आहे. आधीच अभिजीत दिपके यांचे आई वडील अभिजीत यांच्या अटकेमुळे भावनिक झाले होते आणि त्यात आता आजीच्या निधनाने कुटुंबीय खचले आहेत. ही बातमी आम्ही सातत्याने अपडेट करत आहोत..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *