![]()
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीचे आजार पसरण्याची शक्यता असताना महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने ‘डेंगूमुक्त अहिल्यानगर’ साप्ताहिक उपक्रमांतर्गत सहाव्या आठवड्यानिमित्त रेल्वे स्टेशन परिसरात घरोघरी जाऊन पाणीसाठ्यांची तपासणी तसेच डेंगू आजाराबाबत जन
.
माजी उपमहापौर गीतांजली काळे म्हणाल्या, साथीचे आजार पसरू नयेत यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून घराच्या परिसरात पाणी साठू न देता परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे गरजेचे आहे. नगरसेवक बांगरे म्हणाले, महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये नागरिकांसाठी चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत आणि नागरिक मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ घेत आहेत. आशा सेविकाही विविध शासकीय आरोग्य योजना नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत आहेत. डेंगू आजाराबाबत या अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असल्याने रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत आहे.
विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून केली जनजागृती विद्यार्थ्यांनी डेंगू आजाराबाबत पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. डेंगू प्रतिबंधासाठी स्वच्छता, पाणीसाठे टाळणे आणि नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीबाबत विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे जनजागृती केली. डेंगूमुक्त अहिल्यानगरसाठी प्रशासनासोबत नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा असून प्रत्येकाने आपल्या घरापासून स्वच्छतेची सुरुवात करून डेंगू प्रतिबंधाच्या उपाययोजनांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.