Headlines

विधान परिषद निवडणूक महायुती म्हणून लढणार : महसूलमंत्री:‘पदवीधर’साठी केणेकर मुंबईत; पण बावनकुळेंनी दिले ‘महायुती’चे संकेत




राज्यातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या जागावाटपाबाबत २ दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात बैठक झाली आहे. या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत हे निश्चित. महायुतीतील घटक पक्षाकडे संबंधित मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. मात्र याबाबत बोलण्याचा अधिकार मला नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करतील, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (२ आॅक्टोबर) येथे सांगितले. त्यामुळे भाजपने पदवीधर मतदारसंघावरील दावा सोडला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, मतदानाला केवळ २० दिवस शिल्लक राहिलेले असताना महायुतीकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. भाजपचे माजी आमदार संजय केणेकर मागील ८ दिवसांपासून मुंंबईत ठाण मांडून आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री बावनकुळे यांची भेट घेत मैत्रीपूर्ण लढतीसाठी परवानगी मागितली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केणेकरांनी ४ वेळा भेट घेतली, परंतु केणेकरांना कुठलाच शब्द श्रेष्ठींकडून मिळालेला नाही. या मतदारसंघात २३ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. मागील २ वर्षांपासून भाजपने मराठवाडा पदवीधरसाठी तयारी सुरू केली होती. निवडणुकीसाठी माजी आमदार केणेकर यांना प्रथम मराठवाडा पदवीधरसाठी नियुक्त केले. त्यानंतर निवृत्त शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. देशमुख यांनी प्रवेश करताच त्यांना मराठवाडा पदवीधरसाठी जबाबदारी देण्यात आली. देशमुखांच्या जबाबदारीमुळे संभाव्य उमेदवारी देण्यासंबंधी कयास लावला जात होता. भाजप मराठा उमेदवाराच्या शोधात होता त्यामुळे देशमुख यांची निवड योग्य ठरेल अशी शक्कल लढवली जात असताना भाजपने केवळ २० दिवसांवर निवडणूक असताना कुठलीच घोषणा केली नाही. दिव्य मराठी इनसाइड स्टोरी: पक्षश्रेष्ठींच्या नजरेत येण्यासाठी जागेचा आग्रह भाजप आपली मागणी पूर्ण करू शकत नाही हेदेखील माजी आमदार केणेकरांची यांना माहिती आहे. केणेकरांना केवळ १४ महिन्यांची आमदारकी मध्यंतरी मिळाली होती. केणेकरांना पूर्ण टर्म आमदारकीसाठी दावा राहणार आहे. पदवीधरसाठी उमेदवारी मिळाली नसली तरी पक्षश्रेष्ठींच्या नजरेत भरल्याने भविष्यात विचार होईल यासाठी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. राज्यात राष्ट्रवादी (अजित पवार), शिंदेसेना व भाजप अशी महायुती असल्याने मराठवाडा पदवीधरवर मागील ३ टर्म आमदार असलेल्या चव्हाण यांचा दावा आहे. भाजप या मतदारसंघाच्या मोबदल्यात विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र पदवीधर पारड्यात पाडून घेऊ शकतो. केणेकर यांचे जागा घेण्याचे प्रयत्न निष्फळ:
पूर्वी भाजपकडे मतदारसंघ, त्यामुळे मागणी भाजपचा हा परंपरागत मतदारसंघ होता. प्रारंभी जनसंघाच्या काळात उत्तमराव पाटील, अहिल्या रांगणेकर यांनी मतदारसंघ संयुक्त असताना प्रतिनिधित्व केले होते. तत्कालीन केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड पाटील यांनी काँग्रेसच्या वसंत काळे यांना पराभूत करीत दोन वेळा विजय प्राप्त केला. श्रीकांत जोशी यांनीही मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. २००८ पासून आजपर्यंत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांची एकहाती सत्ता आहे. या काळात एकवेळ भाजपचे श्रीकांत जोशी व दोन वेळा शिरीष बोराळकर यांचा पराभव केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *